केमोथेरपीच्या जोडीला रेडिओथेरपी हासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. हे दोन्ही पर्याय नाही चालले तर शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर जगभरात नवनवीन उपचारपद्धती विकसित केल्या जात आहेत. जगातील सर्वात जास्त संशोधनाचा निधी हा कर्करोग या एका आजारावर वापरला जातो आहे. तरीसुद्धा कर्करोग पूर्णपणे बरा होईल, अशी एकही उपचारपद्धती विकसित झालेली नाही. कर्करोग हा एकच आजार नसून तो अनेक आजरांचा समूह असतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, म्हणजे जेव्हा कर्करोगाचा ट्युमर शरीरामध्ये वाढत असतो तेव्हा किंवा अगदी लहान असतो तेव्हा त्याचे निदान करता येत नाही किंवा आपल्याला कर्करोग झाला आहे, हेही समजत नाही. कर्करोगाची लक्षणेसुद्धा एकसारखी नसतात. त्यामुळे नक्की कर्करोग आहे की दुसरा कोणता आजार आहे हेही समजत नाही. कर्करोग नक्की कशामुळे होतो याचे ९५% कारण अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे त्या आजाराचा अंदाजदेखील लावता येत नाही.
कर्करोग करतो स्वतःचे नियंत्रण कर्करोग हा आपल्या शरीराच्या आतील अजून एक शरीर असते. कर्करोग वेगाने वाढतो. केमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्लक असेल तर पुन्हा तो शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला, असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो. शरीरामध्ये जसा मेंदू सर्व अवयवांचे नियंत्रण करतो तसेच कर्करोगसुद्धा स्वतःचे नियंत्रण करतो. या सर्व कारणामुळे कर्करोग नियंत्रणात येत नाही. रोग वेळीच रोखता येईल?साधारणपणे तीस वर्षांपूर्वी गावामध्ये वर्षात एखादा कर्करुग्ण रुग्ण दगावत असे. आज मात्र रोजच्या रोज आपल्या गल्लीमध्ये, शेजारी किंवा पाहुण्यांमध्ये कर्करुग्ण सापडत आहेत.
जगभरतील विविध आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्वेनुसार सन २०५०मध्ये भारतात दर १०लोकांमागे तीनजणांना कर्करोग झालेला असेल. बदलेली जीवनशैली, वातावरणातील बदल, अयोग्य आहारपद्धती, शहरांमधील लोकांमधील व्यायामाचा अभाव, इतकेच काय शरीरावर भरमसाठ औषधांचा मारा यामुळेसुद्धा कर्करोग वेगाने पसरतो आहे. आत्तापासूनच या आजाराबद्दल जनजागृती केली तर आपण वेळीच कर्करोगाला रोखू शकतो. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय यांचा कर्करोग वेगाने पसरतो आहे. त्यामुळे साधरणपणे वयाच्या चाळिशीनंतर महिलांनी वर्षातून एकदा स्तन आणि गर्भाशय यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. महिलांनी यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. तसेच सरकारी आणि खासगी यंत्रणेच्या मदतीने महिलांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले पाहिजेत. पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस, मूत्राशय आणि आतड्यांचा कर्करोग वेगाने वाढतो आहे. पुरूषांमधील तंबाखू, सिगारेट आणि दारूचे व्यसन घटले पाहिजे. तसेच नेहमी बाहेरचे कमी शिजलेले अन्न खाणे टाळणे, रोजच्या रोज एक तास पळणे किंवा व्यायाम करणे,
आठवड्यातून एखादा दिवस हलका आहार असे साधे जरी प्रयोग केले तरी आपण कर्करोगाला दूर ठेवू शकतो.कोरोना विषाणूसारखा आजार एकदा झाल्यानंतर पुन्हा-पुन्हा होत नाही. याउलट कर्करोग मात्र ९० टक्के पुन्हा उद्भवतो. अशा वेळी तो उपचारांच्या नियंत्रणाबाहेर जातो. अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीमध्ये अत्याधुनिक अशी इम्युनोथेरपी किंवा लक्ष्यानुरोधी कर्करोग उपचारपद्धती विकसित झाली आहे. ती मात्र अतिशय खर्चिक आहे. सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा खर्च परवडत नाही. बड्या सेलिब्रिटी, खेळाडू किंवा राजकीय नेते यांना त्याचा खर्च परवडतो. भारतामधूनसुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कर्करोगाचे निदान झालेले सेलिब्रिटीज हे अत्याधुनिक उपचारासाठी परदेशात जातात, त्यामुळे कर्करोगाचे लक्षणे दिसतात आपण त्याबद्दल गांभीर्याने लक्ष देऊन सुरवातीलाच उपचार सुरू करायला हवा.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Share your comments