योग्य आहार आणि उत्तम आरोग्य हे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. जर का शरीराला उत्तम आहार मिळाला तरच आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. आपल्या शरीराला अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते ती आपल्याला फळे पालेभाज्या याच्या माध्यमातून मिळत असते.
तांदळाच्या पाण्याचे सेवन फायदेशीर:-
आपण आपल्या आहारात भात हा खातोच. काही लोक तांदूळ उकळून भात तयार करत असतात आणि त्यातून निघालेले पाणी टाकून देतात परंतु अनेक लोकांना माहीत नाही की, ते पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते या पाण्यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.
पोटासंबंधित असलेले आजार नाहीसे होतात:-
तांदळाच्या या पाण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म चे प्रमाण वाढण्यास मदत होते.तयामुळे आपली पचनक्रियाही तंदुरुस्त होते यामुळे पोटासंबंधीत असलेले आजार दूर होतात.
हेही वाचा:-राज्यात वाढता उकाडा,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाज
डायरीया पासून बचाव होतो:-
जर का डायरीया चा त्रास कोणाला होत असेल तर त्याने दिवसातून 2 ते 3 वेळा तांदळाच्या पाण्याचे सेवन करावे. अश्याने 2 दिवसात डायरीया नाहीसा होऊन शरीराला आराम मिळतो.
वायरल इन्फेक्शन पासून बचाव:-
वायरल इन्फेक्शनचा ताप आला आणि या काळात जर तुम्ही तांदळाचं पाण्याचे सेवन केले तर शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. सोबतच तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व सुद्धा मिळतात.
हेही वाचा:-पोटावरील वाढलेली चरबी लगेच कमी करायची असेल तर डिनरमध्ये खा हे पदार्थ, मग बघा कमाल!
हाय ब्लड प्रेशर करा कंट्रोल -
तांदळाचं पाणी हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही फायदेशीर आहे. तांदळामध्ये सोडियम कमी असल्या कारणामे ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनने ग्रस्त लोकांना याचा फायदा होतो.
त्वचेला निखार आणि चमकदार बनवा-
जर का तांदळाच्या पाण्याचे सेवन केले तर आपल्या त्वचेची चमक वाढते. तसेच कापसाच्या साह्याने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेला ग्लो येऊन चेहरा चमकदार बनतो.
Share your comments