आले हा एक मसाल्यामधील महत्वाचा घटक आहे. आले हे एक आपल्या शरीरासाठी पोषक असे मानले जाते. सर्दी खोकला यासाठी हे खुप उपयुक्त आहे. बायोऍक्टिव्ह युक्त आले असते तसेच याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप आहे.
तर चला जाणून घेऊया आले खाण्याचे फायदे:-
१. आले हे एक नैसर्गिक औषध आहे. यामध्ये फेणोलीक असा एक घटक असतो त्या घटकामुळे अपचन तसेच जळण याला आराम भेटतो. आले खान्यापासून पित्त होत नाही. आले खाल्याने तोंडाची दुर्गंधी येत नाही तसेच तोंडामध्ये लाळ साचते त्यामुळे घास गिळण्यास मदत होते.आले हे एक तापमान कमी करणारे आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या सुखा मेवा भिजवून खाण्याचे शरीरास होणारे फायदे
2. आल्यामुळे आपली पचन क्रिया चांगली राहते, तसेच आपले भूक वाढवण्याचे काम सुद्धा करते. जर पित्त झाले असेल मळमळ होत असेल उलटी आल्यासारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर सोबत घेतला तर लगेच फरक पडतो. सर्दी व कफ यावरती सुद्धा हे खूप गुणकारक मानले जाते त्यासाठी तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा खिस करून ते मिश्रण उकलायचे न नंतर पिले की लगेच फरक पडेल. सांधेदुखी असेल तरी आले खूप फायद्याचे आहे , त्यासाठी तुम्ही आल्याचा काढा घेऊ शकता. मधुमेह , मोतिबिंबु यासाठी पण आल्याचा रस नियमित पणे घ्यावा.
हेही वाचा:-धोकादायक घोणस अळीपासून स्वत:ला आणि पिकाला कसे वाचवावे, वाचा सविस्तर
3. शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी सुद्धा आले गुणकारक मानले जाते. जेवणानंतर पोटात गॅस झाला तर आल्याचे चाटण चाटने. ते पोटातील वेदना कमी करते. सर्दी खोकला जर येत असेल तर आल्याचा रस माधासोबत सम चमच्याने घेतल्यास सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते.
४. आले व तुळशीचा काढा शरीरासाठी एकदम गुणकारक. हा काढा सर्दी, खोकला, डोकेदुखी वरती अत्यंत लाभकारक. अजीर्ण झाल्यास आल्याचा तुकडा तोंडात धरून ठेवला की त्याचा रस साचून तोंडातील लाळ पोटामध्ये जाते व पचन होण्यास मदत पडते.
Share your comments