सध्याच्या काळात ताणतणावामुळे (stress) आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे अनेकांना नाहक आजारांना सामोरे जावे लागते. बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा (Acidity) त्रास उद्भवत असतो.
कित्येक लोक याकडे दुर्लक्ष करतात मात्र ती हृदयविकाराची प्राथमिक लक्षणेही (Primary symptoms of heart disease) असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही फायद्याचे ठरेल.
लक्षणे आणि त्यावर उपाय
1) गॅस, ॲसिडिटीचा त्रास कमी होऊन पोट नेहमी साफ राहात नाही, या उलट पोटाला फुगारा येणं, ढेकर येणं, आंबट पाणी घशात येणं अशा लक्षणांनी अनेकदा आपण अस्वस्थ होतो.
2) जेवताना अन्नाबरोबर गिळल्या गेलेली हवा जठर रिकामे होताना तोंडाद्वारे निघते. त्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ही क्रिया प्रत्येक माणूस कमी जास्त प्रमाणात अनुभवतो. यामुळे जेवणानंतर लगेच झोपू किंवा बसू नये. थोडे चालावे, वायू जठरामध्ये वा आतडीमध्ये जमा होतो तेव्हा पोटाला फुगारा येतो.
3) जेवणातील पिष्टमय पदार्थ, जसं गहू, बटाटे, डाळी याशिवाय कडधान्ये, शेंगदाणे यांचं व्यवस्थित पचन न झाल्या मुळे देखील आतडीत जास्त वायू तयार होतो. आतडीमध्ये जिवाणूंचं प्रमाण वाढण्यास देखील हा त्रास वाढू शकतो.
4) कधी-कधी काही पोटाच्या विकारांमध्ये आतड्यांची हालचाल मंदावते व त्यामुळे वायू आतडीत जमा होतो. काही आतड्यांच्या आजारांमध्ये आतड्यांचा अवरोध (ऑब्स्ट्रॅक्शन) होतो. त्यामुळे पोट फुगणं, पोट दुखणं, गॅस न निघणं असा त्रास होतो.
आजचा संपूर्ण दिवस ठरणार फायद्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
5) राज्यात बाजरी अनेकांचे मुख्य अन्न आहे बाजरीची भाकरी सर्वांनाच आवडते. बाजरीत भरपूर फायबर आढळते. जे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. आणि बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील कार्य करते.
6) तसेच शरीरातील पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात पपेन नावाचे नैसर्गिक पाचक एंझाइम असते, जे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या लक्षणांपासून आराम देते. अशा स्थितीत हे सॅलेड आपण दररोज नाश्ता पर्याय म्हणून वापरू शकता.
7) अॅसिडिटीला वेळीच आवर घातला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जठराला आतून सुरक्षित ठेवण्याकरता पातळ आवरण असतं. अॅसिडच्या जास्त प्रमाणामुळे या आवरणाला इजा होऊ शकते, जखमा होऊ शकतात, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक ठरते.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी रुपयांची मदत जाहीर
शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन
LIC ची नवीन योजना लाँच; फक्त 5 हजार रुपयांमध्ये जबरदस्त फायदे आणि बोनसही
Share your comments