सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात वातावरण सतत बदलत असते. अधेमध्ये ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण तर कधी अचानक थंडी वाढणे यामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होतो. वतावरणातील बदलामुळे सर्दी खोकला येणं ही सामान्य (General) गोष्ट आहे परंतु याची योग्य वेळेत योग्य काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी घरगुती उपाय (remedies) कायम फायदेशीर ठरत असतात.
सर्दी खोकल्यावरती आयुर्वेदिक उपचार
१) या काळात गरम पाणी प्यावे. खोकला घालवण्यासाठी आले,दालचिनी आणि काळ्या मिऱ्यांना उकळून प्यावे.
२) हळदीचे दूध सुद्धा यावर अधिक किफायतशीर ठरते.
३) एक चमचा कांद्याच्या रसात मध मिसळून रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने आराम मिळतो.
४) मोहरीच्या तेलामध्ये ४-५ लसणाच्या पाकळ्या टाकून पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश (Rub) करावी.
५) एक कप पाण्यात अर्धा चमचा जेष्ठमधाची पावडर आणि ८-१० तुळशीची पाने टाकून ते उकळून घ्या.
६) जवस आणि तिळाची पुड कोमट पाण्यात टाकून पिल्याने लगेच आराम मिळतो.
हॉस्पिटलममध्ये जाण्याआधी एकदा हे उपाय कराच
सध्याचे वातावरण खराब असून कोव्हिडं (Covid 19) चा धोका अजूनही पूर्णपणे टळला नाही आणि फ्ल्यु चे इन्फेक्शन सुद्धा होत आहे.
अशा वेळी घराबाहेर पडून आजाराला मिठीत घेण्यापेक्षा किमान एकदा तरी गे आयुर्वेदिक उपाय घरच्याघरी आजमावून पहावेत.
वतावरणातील बदलामुळे सर्दी खोकला येणं ही सामान्य (General) गोष्ट आहे परंतु याची योग्य वेळेत योग्य काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी घरगुती उपाय (remedies) कायम फायदेशीर ठरत असतात.
Share your comments