उत्तम आरोग्यासाठी आपला आहार हा संतुलित असणे खूप गरजेचे आहे. कारण आहाराच्या माध्यमातून शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता केली जाते.या पोषक घटकांमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे तसेच फॉस्फरस, प्रोटीन आणि कॅल्शियम सारख्या घटकाची शरीराला आवश्यकता असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण चिया सीड्सचा विचार केला तर हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त आहे.
यामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्व तसेच प्रोटिन,फायबर तसेच कॅल्शिअम,ओमेगा 3 फॅटी अॅसिडस,अँटीअक्सिडेंट इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. चिया सीड खाण्याचे शरीराला खूप मोठे आरोग्यदायी फायदे आहेत. या लेखात आपण या बाबतीत माहिती घेऊ.
नक्की वाचा:जाणून घ्या लिंबाचे लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास
चिया सीडचे आरोग्याला होणारे फायदे
1- वजन कमी करण्यास- बरेच जण वजन कमी करण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपाय योजतात. परंतु याबाबतीत चिया सीडचे सेवन खूप लाभदायी ठरू शकते.
यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि प्रोटिन यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि वजन पटकन कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर बद्धकोष्टता तसेच अपचन आणि गॅसच्या समस्येपासून देखील आराम मिळतो.
2- त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी- यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि मॅग्नेशियम त्वचेला चमकदार बनवते. एवढेच नाही तर वाढत्या वयामध्ये चेहऱ्यावर असलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील कमी होण्यास मदत होते.हे केसांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचे आहे.
नक्की वाचा:Calcium Food: हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत
3- चांगली झोप येण्यासाठी- बऱ्याच जणांना निद्रानाश आणि तणावाचा त्रास असतो. अशा व्यक्तींनी जर चिया सीडचे सेवन केले तर फायदा होतो कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस असल्यामुळे चिंता, ताणतणाव आणि निद्रानाशाची समस्या कमी होऊ शकते व उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.
4- हाडांच्या मजबुतीसाठी- हाडांच्या अनेक प्रकारच्या समस्यांवर या माध्यमातून मात करता येते. चीया सिडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते.
त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
5- कमी कोलेस्ट्रॉल- चिया सीडचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार होत नाही. यामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट आढळतात जे शरीराला डिटॉक्स करतात त्यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाते व शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते.
नक्की वाचा:Health: ओळखा 'या' लक्षणांना आणि वेळीच सावध व्हा हार्टअटॅक पासून, वाचा सविस्तर
Share your comments