आपल्या देशात सण - उत्सवाला सुरुवात झाली की घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवायला हमखास सुरुवात होते. या गोड पदार्थांमध्ये एक छोटीशी पण अत्यंत पौष्टिक अशी गोष्ट वापरली जाते. ती म्हणजे चारोळी (charoli) . चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. विशेषतः गोड पदार्थांमध्ये जसे की, प्रसादाचा शिरा, दुधाची बासुंदी, दिवाळीत घरोघरी होणा-या करंजा, लाडू यांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र नखभर असलेल्या या चारोळीचा वापर इथेच संपत नाही. आजच्या भागात आपण इवल्याश्या चारोळीची किमया जाणून घेणार आहोत.
चारोळी हा सुकामेवा केवळ गोड पदार्थांपुरता मर्यादीत नाही. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असल्याने आपण आपल्या दररोजच्या आहारात याचा समावेश करू शकतो. यात तीस टक्के मांसवर्धक पदार्थ आणि साठ टक्के स्निग्ध पदार्थ आहे. शिवाय चारोळी हे लहान मुलांकरिता उत्तम टॉनिक असल्याचं म्हटलं जात.
चारोळीबद्दल थोडक्यात -
चारोळीच्या बिया या ॲनाकार्डीयास नावाच्या झाडापासून मिळतात. चारोळीचे झाड हे कोरड्या डोंगराळ भागात आढळते. विशेष करून दक्षिण भारत, ओडिसा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छोटा नागपूर इत्यादी ठिकाणी ही चारोळीची झाडे आहेत. याच्या बिया म्हणजेच चारोळी.
आरोग्यवर्धक चारोळी -
आयुर्वेदामध्ये, खोकला, श्वासोच्छवासाच्या समस्या, डोकेदुखी, तोंडात व्रण इत्यादीसारख्या आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून याचा वापर केला जातो .
चारोळीच्या बिया या मधुमेह आणि कोलेस्टेरॉलसाठी अतिशय गुणकारी आहेत.
पचनास मदत करते
चारोळी ही पचनक्रिया बरे करण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात असणाऱ्या अँटी-गॅस्ट्रिक आणि तुरट गुणधर्मांमुळे पचनक्रिया बरे होण्यास मदत होते.
पोटात गॅस, गोळा येणे, पोट फुगणे आणि पोटदुखी अशा समस्यांवर चारोळी प्रभावीपणे काम करते. याशिवाय, बद्धकोष्ठता , अतिसार, अल्सर, जठराची सूज आणि पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होण्यावर हा एक प्रभावी उपाय आहे.
वजन कमी करण्यास उपयुक्त
चारोळ्यांमध्ये सर्वप्रकारची पोषण तत्वे आहेत. व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, यांचे प्रमाण मुबलक असते. विशेष म्हणजे चारोळीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यात लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आणि कॅल्शियम ही पोषण तत्व भरपूर प्रमाणात असल्याने पदार्थातील त्याचे प्रमाण जरी कमी असले तरी त्याचा शरीराला खूप फायदा होतो.
चारोळीचे फायदे -
शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी उपयुक्त आहे. तसेच शारीरिक वाढीसाठीदेखील याचा फायदा होतो.
जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने याचा त्रास कमी होतो.
वारंवार तोंड येण्याचा त्रास जाणवत असेल तर या चारोळीचे 3-4 दाणे चघळा.
डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे गुणकारी आहे. महत्वाचं म्हणजे चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज भासत नाही.
त्वचाविकारात चारोळी वाटून त्याचे उटणे केल्यास त्वचेला खूप फायदे होतात .
चारोळीच्या तेलामुळे केसांची गळती तर थांबतेच पण केस काळे होण्यासही मदत होते.
चारोळीचा वापर सौदर्यप्रसाधनातही करण्यात येतो.
एवढ्याश्या दिसणाऱ्या या चारोळीचे फायदे मात्र हजारो आहेत.
महत्वाच्या बातम्या
कालानमक तांदूळ आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या तांदळाची खास वैशिष्ट्ये
प्राण्यांना थंडी पासून वाचवण्यासाठी करा या उपाययोजना; हमखास होणार फायदा
Share your comments