1. आरोग्य सल्ला

उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे आणि उपाय

काहीवेळा आपल्या पोटात उजव्या बाजूला वेदना होऊ लागतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे आणि उपाय

उजव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे आणि उपाय

या पोटदुखीची वेगवेगळी कारणे असू शकतात. कारण आपल्या पोटात उजव्या बाजूस यकृत, पित्ताशय, आतड्याचा उजवीकडील भाग,अपेंडिक्स, उजव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये rightovary असे अवयव असतात. त्यामुळे विवध कारणांमुळे उजव्या बाजूला पोटदुखी होऊ शकते. पोटात उजव्या बाजूला दुखणे याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.पचनासंबधित गॅसेस,अपचन,बद्धकोष्ठता (Constipation),

गस्ट्रोएन्टेरिटिस, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), IBD, अन्न विषबाधा अशा कारणांनी उजव्या बाजूस पोटात दुखू लागते.अपेंडक्सला सूज आल्याने पोटात उजवीकडे दुखते.उजव्या किडनीत स्टोन किंवा इन्फेक्शन झाल्याने पोटात उजव्या बाजूला दुखते.हर्नियामुळे सुध्दा काहीवेळा उजव्या बाजूला पोटदुखी होते.यकृताला सूज येणे, यकृताचे आजार तसेच पित्ताशयातील खडे यामुळेही उजव्या बाजूला पोटात दुखू लागते.स्त्रियांमध्ये मासिक वेळी, तसेच गरोदरपणात Ectopic pregnancy मुळे उजव्या बाजूला पोटात दुखू शकते.

कधी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे ?

खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.पोटात उजव्या बाजूला अतिशय वेदना होणे,छातीत दुखणे,ताप येणे,शौचावाटे रक्त पडणे,लघवीतून रक्त पडणे, उलट्या होणे,उलटीतून रक्त पडणे, त्वचा पिवळसर होणे,पोटावर सूज येणे अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.पोटात उजव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपायअर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे. गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.

आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळाव. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे. चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा. डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते. पोटावर गरम शेक घ्यावा.हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे पोटात उजव्या बाजूला दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात उजवीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

 

डॉ. सतीश उपळकर

संकलक : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Causes and remedies for abdominal pain on the right side Published on: 05 May 2022, 09:43 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters