1. आरोग्य सल्ला

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी

जर तुम्हाला सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्युमोनिया असू शकतो. कोरोना विषाणू हा उच्च तापमान 30-35 ला जिवंत राहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक गरम पाणी प्या. सूर्यप्रकाशात जा हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे.

KJ Staff
KJ Staff


जर तुम्हाला सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्युमोनिया असू शकतो. कोरोना विषाणू हा उच्च तापमान 30-35 ला जिवंत राहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक गरम पाणी प्या. सूर्यप्रकाशात जा हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे.

कोरोना विषाणू

कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. 2003 मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला मर्स हा आजार हेसुद्धा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतात सुरु झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला, तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास कोविड-19 असे नाव दिले आहे.

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे

ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फुएन्झा या आजारासारखेच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

डॉक्टरांचा सल्ला

  • कोरोना विषाणू हा 400-500 एम साईजचा असल्याने कोणत्याही मास्कने (फक्त एन-95) नव्हे अटकाव होवू शकतो. परंतु जर एखादा संसर्गबाधित रुग्ण तुमच्या जवळ शिंकला तर तो विषाणू जमिनीवर पडण्यास 3 मीटर (10 फूट) अंतरावर पडतो.
  • सदर विषाणू धातूवर पडल्यास 12 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणून जर तुमचा कुठल्याही धातूशी संपर्क आल्यास हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे सॅनिटायझरवर विसंबून राहू नका.
  • कपड्यावर हा विषाणू 6 ते 12 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो साधे डिटर्जेंट त्याला मारु शकतो. हिवाळ्याचे कपडे रोज धुवायची गरज नाही, ते तुम्ही उन्हात 4 तास ठेवल्यास विषाणू मरतो.
  • सर्वात आधी विषाणू घशाला संसर्ग करतो. सदर सुका घसा खवखवणे 3 ते 4 दिवस राहतो.
  • नंतर हा विषाणू नासिकेतील द्रवामध्ये मिसळून श्वासनलिकेतून फुफ्फुसात शिरकाव करतो व न्युमोनियानंतर खूप ताप येणे श्वास घेण्यास त्रास होणे नाक बंद होणे आपल्याला पाण्यात बुडताना वाटते तशी परिस्थिती होते त्यावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.          

प्रतिबंधात्मक उपाय

  • सर्वसामान्यपणे लोकांमध्ये स्पर्शाने संसर्ग होऊ शकतो म्हणून वारंवार हात धुणे आवश्यक आहे. विषाणू हा तुमच्या हातावर 5 ते 10 मिनिटेच जिवंत राहू शकतो परंतु त्याच 5 ते 10 मिनिटात भरपूर नुकसान करु शकतो तुम्ही तुमचे डोळे चोळू शकता किंवा नाक पुसू शकता (स्वच्छ कापडाने)
  • हात धुण्याव्यतिरिक्त बेटाडीन गारगल ने गुळण्या करु शकता जर विषाणू तुमच्या घशात असतील तर फुफ्फुसात जाण्याअगोदर ते तुम्ही काढू शकता किंवा कमी करु शकता.

डॉ. अविनाश भागवत
(वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे)

English Summary: Care should be taken for prevent corona infection Published on: 15 March 2020, 02:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters