1. आरोग्य सल्ला

रेबीज पासून सावध रहा, वाचा सविस्तर

आजकाल अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारांची लागण होत आहे तसेच काही असे सुद्धा आजार आहेत की त्याचे इन्फेक्शन एकदा झाले तर माणसाला आपला प्राण गमवावे लागतात त्यामधील एक आजार म्हणजे रेबीज. रेबीज होण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे

आजकाल अनेक लोकांना वेगवेगळ्या आजारांची लागण होत आहे तसेच काही असे सुद्धा आजार आहेत की त्याचे इन्फेक्शन एकदा झाले तर माणसाला आपला प्राण गमवावे लागतात त्यामधील एक आजार म्हणजे रेबीज. रेबीज होण्याची अनेक वेगवेगळी कारणे आहेत.

देशामध्ये कुत्रा चावल्यामुळे रेबीज संक्रमित होण्याचा धोका जास्त असतो. कुत्र्यामध्ये सुप्तावस्थेत असणाऱ्या अनेक विषाणू, जिवाणू, बुरशी तसेच आंतर आणि बाह्य कृमींमुळे त्यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना या सूक्ष्मजीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ रेबीज होण्याची संभव्यता जास्त असते. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होणाऱ्या माणसांचे प्रमाण 99 टक्के जास्त आहे.

हेही वाचा:-यूट्यूब वर शिकून केली ड्रॅगन फळ लागवड, पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन

 

 

रेबीज झालेल्या कुत्र्याची लक्षणे:-
1) कुत्र्याला ताप येतो, आवाजात बदल होतो, तोंडावाटे सतत लाळ गळते तसेच त्यांच्या वागणुकी मद्ये सुद्धा बदल होतो. त्यानंतर उत्तेजित स्वरूपाची लक्षणे दिसायला लागतात . यामध्ये श्‍वान सैरावैरा धावतो, तोंडावाटे फेस येतो.
2) जबद्यातील स्नायूंना लखवा झाल्याने तो सापडेल त्या वस्तूला चावयचा प्रयत्न करत त्यावरून आपल्याला समजू शकते.
3) पाणी बघून कुत्रा सैरावैरा पळत सुटतो आणि पाण्याला जास्त घाबरतो.

हेही वाचा:-धोकादायक घोणस अळीपासून स्वत:ला आणि पिकाला कसे वाचवावे, वाचा सविस्तर

 

 

रेबीज झालेल्या व्यक्तीची लक्षणे:-
1)आजाराच्या सुरवातीला ताप येणे, झोप न लागणे, चित्र-विचित्र भास होतात.
2) चावा झालेल्या ठिकाणी दुखणे/आग होणे/खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात.
3) विषाणूचा प्रसार आणि बाधा जसजसा मज्जासंस्थेमध्ये होतो, तस-तसे आजाराचे स्वरूप बदलते.

आजार टाळणयासाठी महत्वाच्या बाबी:-
1) कुत्रा चावल्यास जखम साबणाने साफ करावी आणि लवकरात लवकर दवाखान्यात जावे.
2) रेबिजबरील लसी घ्याव्या आणि योग्य ती काळजी घ्यावी.

 

English Summary: Beware of rabies, read more Published on: 28 September 2022, 04:49 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters