1. आरोग्य

मूग एक पौष्टिक कडधान्य आहे आरोग्यासाठी फायदेशीर

KJ Maharashtra
KJ Maharashtra
moong

moong

 आहारात विविध पदार्थांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच समतोल आहारात विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळे, धान्य, कडधान्य, दूध इत्यादींचा समावेश उत्तम आरोग्य राखण्यास नेहमीच फायद्याचे ठरते. आरोग्याच्या दृष्टीने 60 ते 65 टक्के पिष्टमय पदार्थ, 20 टक्के स्निग्ध पदार्थ काय करू  आणि 20 टक्के प्रथिने रोजच्या आहारातून मिळणे गरजेचे आहे.

 पिष्टमय पदार्थ भात, पोळी, भाकरी यातून पुरेशा प्रमाणात मिळतात तर स्निग्धांश सुद्धा विविध अण्णपदार्थ जसे तेल, तूप, बटर,  विविध तेलबिया यांच्यातील मुबलक प्रमाणात आपल्या खाण्यात येतात.

 परंतु बरेच आजार हे गरजेचे प्रथिने न मिळाल्यामुळे होतात. प्रथिनांची गरज ही बाल्यावस्थेपासून पूर्ण भागविली पाहिजे. प्रथिनांमुळे शरीरसौष्ठव राखण्यास खूप मदतीचे होते. म्हणूनच प्रथिनांचा स्रोत म्हणून कडधान्य खाल्ली पाहिजेत. सर्वसामान्यपणे मठ, मुग, चवळी,कुळीथ सोयाबीन, राज माह, मसूर इत्यादी रोजच्या दैनंदिन वापरातल्या कडधान्य आहेत. परंतु मूग हे कडधान्य काही विशेष गुणधर्मांनी युक्त आहे.

 आयुर्वेदात ज्यांना मंदाग्नी आहे त्यांनी मुग खाने  चांगले असा संदर्भ आढळतो. मुगा मध्ये 62 टक्के कर्बोदके, 24 टक्के प्रथिने,1.15 टक्के स्निग्धांश असतात. याशिवाय अत्यल्प संतृप्त स्निग्धांश आणि कोलेस्टेरॉलचा पूर्ण अभाव असतो. लोहा, पोटॅशियम, झिंक, फास्फोरस अशी खनिजे आणि अ, ब, क आणि नायसिन अशी जीवनसत्त्वे सुद्धा मुबलक प्रमाणात मुगा मध्ये असतात.

 ताप,स्थूलता, मधुमेह यासारख्या आजारांवर मुग  सेवन अत्यंत फायदेशीर आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी देखील  मुग  आणि मुगाचे पदार्थ उपयुक्त आहेत. सोडियम फ्री असल्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना मूग योग्य आहार आहे.

अशक्तपणा, उष्णता तसेच त्वचा विकारांसाठी सुद्धा मूग पोषक आहे. मुगाचे सेवन करण्यापूर्वी विविध प्रक्रिया करून त्यातील पौष्टिकता वाढवता येऊन लवकर प्रक्रियाशील बनवता येतात. भिजवणे, मोड आणणे, भाजणे, शिजवणे यासारख्या प्रक्रिया करून मुग खाण्यासाठी  सोयीस्कर करतात.

 मुगाचे विविध पदार्थ बनवता येतात. मुगाचे घावन, मुगाचे वडे, मोड आलेले मूग वाळवून त्याची पावडर करून त्यापासून सूप  मिक्स, मुगाचा ढोकळा, मोड आलेल्या मुगाचे रव्या सोबत प्रोटीन बार, मुगाची बर्फी, मुगाचे बिस्किट, केक, शेव, कच्चा मोड आलेल्या मुगाची कोशिंबीरअसे अनेकविधपदार्थ बनवून आहारात मुगाचे प्रमाण वाढवता येऊ शकते.मूग भाजून त्याचे पीठ करून त्यापासून मसाल्यांनी संयुक्तिक थालीपीठ सुद्धा बनवू शकतो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters