
suger cane drink
उस हा देशातील सर्वात महत्त्वाचे कृषी-औद्योगिक पीक आहे. तसेच आपल्या देशातील सर्वात महत्वाचे नगदी पिकं पैकी एक आहे. देशात उत्पादित केल्या गेलेल्या सर्वगोड उत्पादनांसाठी उसापासून तयार केलेली साखर ही प्राथमिक कच्ची सामग्री आहे. उसाचा रस हा एक उच्च ऊर्जा पेय आहे. जे नैसर्गिक आणि शर्करायुक्त गोड निरोगी पेय आहे. भारत हा ऊस उत्पादनात जगातील सर्वात मोठ्या उत्पादकां पैकी एक देश आहे. भारतातील उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये तसेच आंध्र प्रदेश हे प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहेत.
उसामधील पौष्टिक मूल्य
- कर्बोदके 27.51 ग्रॅम.
- प्रथिने 0.27 ग्रॅम
- कॅल्शियम 11.23 मिलिग्रॅम
- लोह 0.37 मिलिग्रॅम
- पोटॅशियम 41.9 मिलिग्रॅम
- सोडियम 17.0 मिलिग्रॅम
उसाच्या रसामध्ये आरोग्यास लाभदायक असे पोषक घटक आहेत जसे की, कर्बोदके, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. जर पोषक घटक त्याचा आदर्श ऊर्जा पेय बनवतात.
उसाच्या आरोग्यदायी फायदे
- उसाचा रस हा खोकला, दमा, मुत्रा रोग आणि किडनी रोगावर अत्यंत गुणकारी आहे.
- त्वचा रोग यावर उत्तम पर्याय म्हणून उसाचा रस फायदेशीर ठरतो.
- उसाचा रस कावीळ या रोगावर गुणकारी आहे.
- कावीळ झाली असल्यास उस रोज सकाळी खाल्ल्यास कावीळ बरा होण्यास मदत होते
- उन्हाळ्यात डीहायड्रेशन ची भिती सतत असते. त्यामुळे उसाचा रस प्यायला आणि डीहायड्रेशन पासून बचाव होतो.
- उसाचा रस हा ऊर्जा ड्रिंक म्हणून पण ओळखला जातो.
- रसामध्ये ग्लुकोजची मात्रा अधिक असते.
- आयुर्वेदानुसार उसाचा रस एकृत बळकट होण्यास मदत करतात.
- उसाचा रस घेतल्याने दातांना होणारे इन्फेक्शन पासून बचाव होतो.
- उसाच्या रसाचे सर्वात महत्त्वाचे आरोग्य फायदे म्हणजे मूत्रपिंड व मूत्रमार्ग संक्रमण, मूत्रपिंडाचे दगड आणि मूत्रपिंडाची योग्य कार्य सुलभ करण्यास मदत करते.
- उसाचा रस खनिजा मध्ये अत्यंत समृद्ध आहे.
- उसाचा रस एक पाचक टॉनिक म्हणून कार्य करते.
- उसाचा रस गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये रोज दिल्यास आरोग्य फायदा होतो.
- उसामध्ये साधे शुगर असतात जे आपल्या शरीरात सहजपणे शोषले जातात. या शुगर चा वापर शरीरातील गमावलेला साखर स्तर पुन्हा भरण्यासाठी केला जातो.
- ऊस हे कॅल्शियमचे अत्यंत समृद्ध स्त्रोत आहे ज्या हाडे आणि दात बळकट करण्यास मदत करते.
- उसाच्या रसा मध्ये उपस्थित पोटॅशियम आपल्या पोटाच्या आमल पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि पाचन रसांचे स्त्राव सुलभ करते.
- उसाचा रस हा कर्करोग विशेषता प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या घातक रोगांमध्ये व्यापक प्रतिबंध करू शकतो.
Share your comments