1. आरोग्य सल्ला

जाणून घ्या कोथिंबीरीचे आरोग्यदायक फायदे

कोथिंबीर आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोथिंबीर ही फक्त आपली खाण्याची चव नाही वाढवत तर कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये कोथिंबिरीची हिरवी पानं आपल्या जेवणात असल्याने अनेक रोगांपासून दूर राहता येते. कोथींबीरीच्या सुगंधी तेलांमध्ये सीटरोनेलोल तत्व असते. हे एन्टीसेप्टिक असते. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास फायदेशीर ठरते. या लेखात आपण कोथींबीरीच्या आरोग्यदायी फायद्याच्या विषयी जाणून घेणार आहोत

KJ Maharashtra
KJ Maharashtra
coriander benifit health

 कोथिंबीरीचे फायदे

  • कोथिंबिरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हे पाणी गाळून त्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यासडोळ्यातुन पाणी येण्याची समस्या दूर होते.
  • कोथिंबीर ताजा ताकात टाकून पिल्याने मळमळ, अपचन, अतिसार आणि आतड्याला आलेली सूज पासून बचाव करता येतो.
  • कोथिंबीर शीत गुणात्मक,अग्निदीपक पाचक, तृष्णाशामक आहे. तसेच तिच्या मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अ, ब, कजीवनसत्व,पोटॅशियम,प्रथिने,स्निग्धता,तंतुमय व पिष्टमय  पदार्थ असतात. या सर्व गुणधर्मामुळे कोथिंबिरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो.
  • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढवण्यासाठी दोन चमचे धने आणि अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकडावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला देण्याचा चहा घ्यावा.  हा चहा प्यायल्याने भूख वाढण्यास मदत होते.
  • कोथिंबिरीचा एक चमचा ज्यूस मध्ये थोडी हळद टाकून मुरमांवर लावल्यास ते बरे होतात. कोथिंबीर, हिरवी  मिरची, किसलेलं खोबरं आली आलं घालून चटणी खाल्ल्याने अपचनामुळे  होणारी पोटदुखीत आराम मिळतो.

  • फ्रिज मध्ये ठेवलेली अतिशिळी कोथिंबीर वापरू नये. तिचा स्वाद औषधी गुणधर्म कमी होतात. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुऊन वापरावी.
  • मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असल्यास सहा ग्राम धने, अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या. फायदा होतो तसेच अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धने टाकून पिल्याने पोट दुखी थांबते.

 टीप – कुठलाही  आरोग्यविषयक उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

English Summary: benifit of coriander to health Published on: 01 July 2021, 10:45 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters