स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे

22 March 2020 10:45 AM


गुलाबी रंगाने व्यापलेले स्ट्रॉबेरी एकमेव असे फळ आहे ज्याचे बी आत नसुन बाहेर असते. त्याचे आकर्षक रूप मनमोहक ठेवण आणि रसस्वादच त्याला इतर फळांपासुन वेगळे आणि प्रसिध्द बनवते. स्ट्रॉबेरी या फळाचा जर तुम्हाला संपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला थेट याचे सेवन करावे लागेल. तसेच स्ट्रॉबेरी पासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करू शकतो. त्याच्या पासून आईसक्रीम, जेली, सिरप, चॉकलेट आदी पदार्थांमधे देखील तयार करू शकतो.

स्ट्रॉबेरी जीवनसत्त्व सी आणि के सोबतच फॉलीक ऍसिड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप स्ट्रॉबेरीत ४९ कॅलरीज असतात यात साखरेचे प्रमाण देखील कमी असते आणि तंतुमय पदार्थचा चा उत्तम स्त्रोत म्हणुन देखील स्ट्रॉबेरीला ओळखले जाते शिवाय स्ट्रॉबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडचे प्रमाण चांगले आढळते. संपुर्ण देशभरात स्ट्रॉबेरीच्या जवळ जवळ ६०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसच सर्वाधिक अँटिऑक्सिडंट असलेल्या फळात याचा समावेश होतो.

स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे

 • स्वस्थ पाचनक्रिया आणि शरीरातील जमा चरबी कमी करण्याकरता
  स्ट्रॉबेरीत तंतुमय पदार्थाचा मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्रॉबेरी आपल्या आतड्यांना स्वस्थ ठेवते, एंथोसायनिन हे लाल रंगाचे अँटिऑक्सिडंट देखील स्ट्रॉबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते या सर्वोत्तम फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते व शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीला विकसीत करतं ज्याने शरीराला आलेला स्थुलपणा सहज कमी होतो. स्ट्रॉबेरी सेवणामुळे हृद्यविकार आणि मधुमेहावर मात करता येते. स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.

 • हाडांच्या स्वास्थ्याला विकसीत करतं
  स्ट्रॉबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि जीवनसत्त्व के सापडतं ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची ताकत वाढते जे आपल्या आरोग्याकरता खुप आवश्यक आहे.

 • हृदयासंबधीचे आजार कमी होतात
  यात आढळुन येणारे फ्लोवोनाईड आपल्या शरीरातील हृदयासंबधीच्या विकारांना कमी करतं त्यासोबतच कोलेस्ट्रालचे प्रमाण कमी करून रक्तदाबची समस्या देखील कमी होते. अभ्यासाअंती हे देखील समजले जी माणसं रोज २ ते ३ स्ट्रॉबेरी खातात त्यांच्यात हृदयाविकाराचे प्रमाण ३२% पर्यंत कमी होते. स्ट्रॉबेरी मेदरहीत असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो. मँगेनिज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीत असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडेदुखीपासून दिलासा मिळतो.

 • संधीवातसाठी उपयोगी
  अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने स्ट्रॉबेरीमुळे संधीवात या आजारांपासुन मुक्ती मिळु शकते. या फळात ते सगळे घटक मिळतात जे आपल्या शरीरातील वेदनांना कमी करून रॅडीकल्स मुळे होणाऱ्या समस्यांना कमी करतं. सांधेदुखीपासून देखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटीऑक्सीडंटस आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात.

 • फॉलीक ऍसिडने भरलेले फळ
  स्ट्रॉबेरी हे फळ तुमच्या शरीराला फोलेट ने भरतं जे खाद्यपदार्थांमधे आढळुन येणाऱ्या फॉलीक ऍसिड चा महत्वपुर्ण भाग आहे. जीवनसत्त्व बी चे प्रमाण शरीरात हवे तेवढे नसेल तर आपल्याला संवहनी रोग, एथेरोस्क्लेरोसिस आणि पचनतंत्रात गडबड सारखे आजार होवु शकतात. तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.

 • आपल्या शरीरातील सुरक्षाप्रणाली विकसीत होते
  स्ट्रॉबेरीत मोठया प्रमाणात जीवनसत्त्व सी आढळतं जे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे आणि ते असल्याने त्याचे दुसरे फायदे देखील आपल्याला मिळतात. तणावपुर्ण स्थितीत जेव्हा शरीर जीवनसत्त्व सी चा उपयोग करतं तेव्हा यात रक्तदाबाला कमी करून सामान्य पातळीवर आणण्याची क्षमता असते ज्यामुळे डोक्यावरील तणावची समस्या सुध्दा कमी होते.

 • मेंदुच्या कार्याला गतीमान करतं
  एजिंग आणि मानवी शरीरातील बऱ्याचशा समस्यांकरता आपण मुक्त रॅडिकल्सला दोष देतो खरतर या समस्या मेंदुतील मेदयुक्तच्या कमतरतेमुळे आणि न्युरोट्रांसमीटर च्या कमजोर होण्यामुळे होतात. स्ट्रॉबेरीत आढळुन येणाऱ्या जीवनसत्त्व सी आणि फायटोन्युट्रियंट मुळे या समस्येला आळा बसतो. लोडीन नावाचे आणखीन एक पोषक घटक स्ट्रॉबेरीत विपुल प्रमाणात सापडतं जे मेंदुच्या कार्याला विकसीत करण्यात सहाय्यक आहे. एंथोसायनिन मधे अल्प मुदत स्मृती भ्रंश ला विकसीत करण्याची क्षमता असते.

 • उच्चरक्तदाबात उपयोगी
  पोटॅशियम आणि मॅग्नेशियम प्रभावी रूपात उच्चरक्तदाबाच्या समस्येला दुर करतात आणि हे स्ट्रॉबेरीत आढळतात. रोज स्ट्रॉबेरी सेवन केल्यास केवळ डोक्यावरील तणावची नाही तर शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवुन स्वस्थ ऑक्सिजनचा संचार शरीरात वाढवतं ज्यामुळे उच्चरक्तदाबाला नियंत्रीत केले जातं.

स्ट्रॉबेरीत जर इतके सगळे गुण आहेत तर मग वाट कसली बघताय. आजपासुनच स्ट्रॉबेरी खायला सुरूवात करा आणि निरोगी आणि स्वस्थ जीवन जगा.

लेखक:
सुग्रीव शिंदे, डॉ. अरविंद सावते
पी एच डी स्कॉलर
अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
८९७५३९९४९१

strawberry स्ट्रॉबेरी folic acid फॉलिक असिड फोलेट Folate vitamin जीवनसत्त्व क vitamin c blood pressure रक्तदाब
English Summary: benefits of strawberry fruit for human health

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.