ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे

08 May 2019 10:48 AM


फ्लाॅवरसारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते. दोघांची चव वेगवेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो. पण परदेशातून आलेली ही भाजी अधिक पोषक आहे. ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही एकाच प्रकारातील भाजी आहे. मात्र त्यामधील पोषणद्रव्य ही थोड्या फार फरकाने सारखीच आहेत फक्त त्याचे प्रमाण बदलते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक फ्ल्वॉवरपेक्षा थोडे अधिक असतात.

या भाज्यांमध्ये डाएटरी फायबर्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. फ्लाॅवर आणि ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. फायबर घटक अधिक असल्याने पचन सुधारायला मदत होते तसेच वजन घटवण्यासही फायदेशीर ठरतात. त्यामध्ये पोषक गुणधर्म अधिक आहेत. पण तुम्ही कॅलरी कॉन्शियम असाल तर ब्रोकोलीपेक्षा फ्लाॅवरमध्ये कॅलरीज कमी असतात. 100 ग्रॅम फ्ल्वॉवरमध्ये 25 कॅलरीज असतात तर तितक्याच ब्रोकोलीमधून 34 कॅलरीज मिळतात. ब्रोकोलीमध्ये अनेक फायदेकारक घटक आहेत. यात लोह, कॅल्शियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 3, बी 6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंटस असतात. ब्रोकोली प्रतिकारशक्ती सुधारते.

ब्रोकलीचे आपल्या दैनंदिन आहारात सेवन करणे, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकत. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्रोकली खाल्याने आपली प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. शिजवण्यापेक्षा वाफवून खाणं अधिक फायदेशीर आहे. उकळून नव्हे तर वाफवून खाल्ल्याने त्यामधील पोषणद्रव्य टिकून राहण्यास मदत होते.

ब्रोकोली चे आरोग्यदायी फायदे:

 • ब्रोकोली हे अँटिऑक्सिडंट मुक्त रेडिकलस नष्ट करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो.
 • गर्भवती महिलांसाठी ब्रोकोली खूप चांगली आहे. ब्रोकोलीमध्ये आढळणारे लोह, फोलेट मुलाच्या मेंदू आणि शारीरिक विकासासाठी चांगले आहे.
 • ब्रोकोलीची बीटा कॅरोटीन, मोतीबिंदू, पेशींच्या दुर्बलतेस प्रतिबंध करते.
 • ब्रोकोलीमध्ये सापडणारे फाइटोकेमिकल आणि सल्फरोफेन घटक शरीराला कर्करोगापासून वाचवतात.
 • ब्रोकोली वजन कमी करण्यात प्रभावी आहे. ते उच्च प्रमाणात फायबर आणि प्रथिने समृद्ध असल्यामुळे जे उपासनेला वेगवान बनत नाही त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.
 • मुलांसाठी, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
 • ब्रोकोलीच्या कॅल्शियम हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो आणि लोह ऍनेमीयापासून बचाव होतो.
 • ब्रोकोली महिला शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनची पातळी नियंत्रित करते. वाढत्या एस्ट्रोजेन हार्मोनमुळे गर्भाशयाचे कर्करोग, स्तन कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
 • ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्ताभिसरणानंतर रक्तस्त्राव थांबविण्यात मदत करते.
 • ब्रोकोलीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी हाडे कोलॅजेन शरीराचे ऊतक बनवते, ज्यामुळे त्वचा जखमांना मदत होते आणि त्वचा कोमल ठेवते.
 • ब्रोकोलीमध्ये भरपूर फायबर असतात, जे पाचन तंत्र व्यवस्थित ठेवतात, लठ्ठपणा कमी करतात.
 • उच्च फायबर शरीरात खराब कोलेस्टेरॉल कमी करते, धमनी निरोगी ठेवते आणि हृदयरोगापासून रक्षण करते.
 • लठ्ठ लोक ज्यांना टाइप 2 मधुमेह रुग्ण आहेत, ब्रोकोली सेवन रक्त शर्करा पातळी कमी करण्यास मदत करते.
 • ब्रोकोलीमध्ये आढळणाऱ्या फायटोन्ट्रियंटसारख्या घटक शरीराचे विषाणूजन्य रोग टाळतात आणि रक्त शुद्ध करतात.
 • ब्रोकलीमध्ये क्रोमियम आणि पोटॅशिअमचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात जर आपण ब्रोकलीचे सेवन केले, तर उच्चदाबासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
 • ब्रोकलीमध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवणारे घटक असतात. त्यामुळे ब्रोकोली खाल्ल्याने मधुमेह होण्यापासून आपली सुटका होऊ शकते.
 • दररोज एक कप ब्रोकली खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे विविध आजार होण्यापासून आपले संरक्षण होऊ शकते.
 • ज्या लोकांना मोतीबिंदूचा त्रास आहे, त्यांनी ब्रोकलीचे सेवन करावे. ब्रोकलीमध्ये बीटा कॅरोटीन आमि अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
 • ब्रोकलीमध्ये कर्करोग रोधक गुणधर्ण असल्यामुळे नियमित 1 कप ब्रोकली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टाळला जाऊ शकतो.


वडमारे
विद्या डॉ. गाढे कैलाश
(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)

Cauliflower कॉलीफ्लाॅवर ब्रोकोली broccoli अँटिऑक्सिडंटस Antioxidant एनेमीया anemia बीटा कॅरोटीन beta carotene
English Summary: Benefits of Healthy broccoli

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.