मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कारण कडधान्य आरोग्यास खूप फायेदेशीर असतात. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये समाविष्ट करा. मोड आलेली कडधान्य आपल्याला अनेक पोषण द्रव्य व विटामिन देत असतात आपण त्यांच्या फायद्याविषयी माहिती पाहणार आहोत.
सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. काही कडधान्य पचायला जड तर काही हलके असतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी नंतर उडीद आणि हरभरा, ही कडधान्यही पचायला हलकी असतात. कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.
१०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्कयापर्यंत प्रथिने असतात, आपण शाकाहारी असाल तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
कडधान्य खाल्ल्याचे फायदे
मोड आलेली कडधान्य मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात.
मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असतं.
मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.
मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं.
मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं.
मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.
मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
Breaking: 'या' राज्यात वाढले दुधाचे दर; दूध उत्पादकांना मिळणार दिलासा
Share your comments