1. आरोग्य सल्ला

तुम्हाला माहित आहे का खपली गव्हाबद्दल?जाणून घेऊ त्याच्या आरोग्यदायी फायदे

खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु या जातीचा गहू बाजारात सहजरीत्या उपलब्ध होत नाही. जर या जातीचा विचार केला तर ही जात पाच हजार वर्षांपूर्वीची आहे असे आढळते.या गव्हाचे वैशिष्ट्य पाहिले तर हा शरीरासाठी फारच उपयुक्त आहे.ज्यांना मधुमेह, हृदय विकार, आतड्याचा कॅन्सर आणि बद्धकोष्टता यासारखे आरोग्यविषयक समस्या आहेत अशांसाठी उपयुक्त आहे. एका अभ्यासाद्वारे सिद्ध झाले आहे की आपली गव्हाचा आहारात उपयोग केल्याने डायबेटिस ग्रस्त रुग्णांमधील ट्रायग्लिसराईड आणि एल डी एल कोलेस्टेरॉल लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
khapli wheat

 बऱ्याच भागांमध्ये अजूनही जुने लोक खपली गहू खातात. या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळी आजही लोक खातात आयुर्वेदामध्ये या गव्हाचे  वर्णन बळ देणारा, वीर्यवर्धक, पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे. गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी, खीर आणि लापशी सारखे पदार्थ छान बनतात. डायबिटीज रुग्णांसाठी आजारी डॉक्टर खपली गहूखाअसं सांगतात. हा गहू आपल्या प्राचीन भारताचा अर्थव्यवस्थेचा कणा होता. गव्हाची जात साधारणपणे पाच हजार वर्षापासून आपल्या भारतात होती असे म्हणतात. आजही अनेक आयुर्वेदिक डॉक्टर आजही हाच  गहू आहारात घ्यायला सांगतात.

 कारण या गव्हाचा माणसाच्या स्वादु पिंडावर विपरीत परिणाम होत नाही आणि मधुमेह व इतर विकार होत नाहीत. मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येतो.

 खपली गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्ये

  • खपली गहू प्रमुख्याने पौष्टिक, वात पित्त नाशक आणि शक्ती वाढवणारा आहे.
  • तसेच हा गहू मधुमेह,हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्ठता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारात आहारात योग्य आहे.
  • हा गहू पचण्यास हलका असल्याने त्यापासून शेवया, कुरडाया, खीर, रवा आणि पास्ता इत्यादी पदार्थ बनवले जातात.
  • या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या इतर गव्हाच्या जाती पेक्षा गोडसर असतात.
  • या गव्हाच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोळीला लालसरपणा असतो आणि ती अधिक चविष्ट लागते.
  • या गव्हाचा वापर अतिशय कमी होत चालला आहे.(स्रोत-krushi. World)
English Summary: benefit of khapli wheat for health Published on: 14 September 2021, 10:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters