भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. दुधाळ प्राण्यांचे संगोपन करून अनेक शेतकरी शेतीव्यवसायासह दुधाचा व्यवसाय करत असतात. पण दुधाचे दोन प्रकार आहेत या प्रकाराविषयी आपणास माहिती आहे का? आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत...
हे प्रकार आहेत ए १ आणि ए २. या दोन्ही प्रकारातील कोणते दूध आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. कोणत्या दुधामुळे तोटे होतात त्याची माहिती या लेखात घेऊया.
ए १ आणि ए २ दुधामधील मूलभूत फरक
परदेशी संकरित गाईंच्या पासून मिळणाऱ्या दुधाला वैज्ञानिक भाषेत ए वन दूध म्हणतात. भारतात उत्पादित होणाऱ्या दुधाच्या एकूण मात्रेत ९५ टक्के ए वन दूध आहे. जर भारतातील मूळ जातीच्या गाई साहिवाल, गिर, लाल सिंधी, हरियाणवी इत्यादी पासून मिळणाऱ्या दुधाला ए टू प्रकारचे दूध म्हटले जाते.
हेही वाचा :दुग्ध व्यवसायात यशस्वी व्हायचंय का ? मग अंमल करा ५१ सुत्री कार्यक्रमाचा
ए १ दुधाची भीती
भारतात वाढले दूध उत्पादन हे संकरित जाती मुळे वाढली आहे. परंतु त्यामुळे काही समज आणि काही गैरसमज समाजात पसरले आहेत. संकरित जातीपासून उत्पादित झालेले दूध हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे का? दरम्यान आंतरराष्ट्रीय दूध बाजारात ए १ दुधाच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ते म्हणजे ए १ मध्ये मिळणाऱ्या बीसीएम ७ हे तत्व माणसाच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे.
आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होऊ शकतात. डेन्मार्क, स्वीडनच्या संशोधनानुसार बीसीएम ७ मुळे डायबिटीज किंवा हृदयरोग होण्याची शक्यता असते. यासह ए १ दूध पचण्यास त्रासदायक असते. त्यामुळे अनेकांना दुग्धशर्करा असहिष्णुता यासारख्या समस्या उत्पन्न होतात.
हेही वाचा :जनावरांतील दुग्धज्वर: कोणत्या कारणांमुळे होतो मिल्क फिवर ; जाणून घ्या! उपचार अन् लक्षणे
ए २ दुधाची गुणवत्ता
देशी जनावरांपासून मिळालेल्या दुधात गुणवत्ता अधिक असते. देशी जातीच्या जनावरांपासून उत्पादित दूधात अमिनो आम्ल प्रोलीन मिळत असते. हेच बीसीएम सातला शरीरात आत्मसात करण्यास परवानगी देत नाही. ज्यामुळे एच २ दूध पचण्यास सोपे आहे. या दुधामुळे कोणताच दुष्परिणाम होत नाही. ए २ दुधाच्या गुणांमुळे बाल कुपोषण सारख्या समस्या दूर करण्यासाठी तज्ञ सेवन करण्याचा सल्ला देतात.
ए २ दुधाच्या मागणीत वाढ
आपल्या औषधी गुणांमुळे न्यूझीलंड आणि अमेरिकेत ए २ दूध जगभरात लोकप्रिय आहे. तर भारतात अमोल सारख्या कंपन्यांनी याचे उत्पादन सुरू केले आहे. बाजार भावातही ए २ चे दर अधिक आहेत.
Share your comments