1. आरोग्य सल्ला

बाळगुटीमध्ये असतो या औषधांचा समावेश नक्की वाचा! खुप फायद्याचे

आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बाळगुटीमध्ये असतो या औषधांचा समावेश नक्की वाचा! खुप फायद्याचे

बाळगुटीमध्ये असतो या औषधांचा समावेश नक्की वाचा! खुप फायद्याचे

आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे.बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी,पचनशक्ती सुधारून अनेक आजारांवर/शारीरिक तक्रारींवर घरीच उपाय करण्यासाठी व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी पूर्वापार चालत आलेली अशी ही घरगुती चिकित्सा पद्धती आहे.

बाळगुटीमध्ये खालील औषधांचा समावेश होतो.Baguti includes the following medicines.मुरुडशेंग - ही १ पोटातील मुरडा कमी करणारी, कृमी कमी करणारी वनस्पती आहे. पोट दुखून, पातळ, फेसकट मलप्रवृत्ती कमी करणारी वनस्पती आहे.हिरडा: याने यकृताचे कार्य सुधारून पचनशक्ती सुधारते. पोटात वात झाल्यास, पोट फुगले असता, पोट रोज साफ होण्यास याचा उपयोग होतो.पिंपळी:श्वसनसंस्था व पचन संस्था उत्तम राखणारे

असे हे औषध आहे. सर्दी, खोकला, अजीर्ण यावर उपयोगी आहे.जायफळ: हे मुलाला झोप येत नसल्यास, शांत झोप लागण्यासाठी पातळ शौचास होत असल्यास 3- 4 वेढे इतकेच द्यावे. वेखंड: मुलांची स्मरणशक्ती, मेधा, बुध्दी,आकलनशक्ती वाढविण्यासाठी रोज द्या. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, कृमी कमी होतात. हे तीक्ष्ण असते त्यामुळे 4-5 वेढेच द्या.बेहडा - सर्दी,खोकला,जुलाब कमी होण्यासाठी उपयुक्त.

ज्येष्ठमध:आवाजाला गोडवा येण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी, वर्ण उजळ करण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी रोज गुटी मधून द्या.नागरमोथा - कृमी कमी करण्यासाठी, लघवीचा त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.काकदशिंगी: उचकी, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, ताप, दात येत असताना होणारा त्रास कमी करण्यासाठी रोज गुटी मधून द्या.

हळकुंड:रक्तशुद्धी करण्यासाठी, कफ, सर्दी, ताप, खोकला कमी करण्यासाठी, वर्ण उजळ करण्यासाठी व जंत कमी करण्यासाठी रोज द्या.कायफल:स्वर सुधारण्या साठी व सर्दी, खोकला कमी करण्यासाठी उपयोगी.मायफल - उलटी, जुलाब कमी करण्यासाठी रोज द्या.सागरगोटे - जंत कमी करण्यासाठी, पोट फुगणे, दुखणे कमी करण्यासाठी रोज द्या.

डिकेमाली :दात येत असताना होणारे सर्व त्रास कमी करण्यासाठी द्या.वावडिंग: उत्तम कृमिनाशक व बाळाची सर्वांगीण वाढ व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे पचन सुधारणे, रक्त शुद्ध करणे यासाठी रोज द्या.सुंठ:पोट दुखणे, सर्दी, ताप, खोकला, डोके दुखणे, जुलाब, उलटी कमी करण्यासाठी रोज द्या.बदाम:पौष्टीक, बुध्दीवर्धक म्हणून रोज द्या.

खारीक :शरीराची ताकत वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी पोषक म्हणून रोज द्या.सुके खोबरे: हाडे बळकट करण्यासाठी, पोषक, केस व वर्ण सुधारण्यासाठी रोज द्या.वरील सर्व औषधी,आईच्या दुधामध्ये, मधात किंवा सुवर्ण सिद्ध जलामध्ये उगाळून द्या. बाळास 35 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंत गुटी द्या. 

रोज सहाण व सर्व औषधी स्वच्छ ऊकळलेल्या पाण्यामध्ये धुऊन, चांगल्या स्वच्छ पांढऱ्या सुती कपड्याने पुसून ठेवा. गुटी तयार करण्याआधी आपले हात स्वच्छ साबणाने धुवा. गुटी देण्याची वेळ शक्यतो एकच ठेवा.बाळाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला रोज गुटी द्यावी.  

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Be sure to read the inclusion of these medicines in the bag! Very useful Published on: 14 August 2022, 05:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters