त्यामुळे प्रत्येकाचा आहार सारखा असू शकत नाही ही बाब सर्वांनी लक्ष्यात घ्यावी. त्या नुसार आहारात बदल करावा लागतो.महिन्यातुन एखाद्या वेळेस/कधी तरी आहारात घेण्यात यावे असे अन्न घटक
मांस,अंडी आणि चिकन, मासे हे पदार्थ खाल्लेच पाहिजे असेही नाही.आठवड्यातून एखाद्या वेळेस आहारात घेण्यात येणार घटक
मिठाई/गोड पदार्थ, फळांपासून/धान्यापासून, सुका मेवा, तेलबिया, फळे (स्थानिक, ऋतूविशेष
रोज आहारात घ्यावे असे घटक:-
तेल (शाकाहारी स्रोताचे), मसाले आणि औषधी वनस्पती, कडधान्ये आणि कडधान्याचे पदार्थ ५-१० टक्के.
चवळी, वाटाणा, सोयाबीन, मसूर, उबवलेले सोयाचे पदार्थ (टोफू, टेम्पे इत्यादी) कमी प्रमाणात, फळभाज्या आणि फूलभाज्या २०-३० टक्के. वांगी, बटाटा, आणि इतर काही वगळता, लोणची विविध प्रकार मात्र कमी प्रमाणात.
धान्ये ४०-६० टक्के - हातसडीचा तांदूळ, ओट्स, किनवा, कॉर्न, कुव, गहू, आदी (प्रक्रिया केलेली धान्ये वापरू नये. उदा. मैदा)
देशी गाईचे दूध रोज घेणे उत्तम...
हे मात्र लक्षात ठेवा
निरोगी जीवनाचा थोडक्यात ठोकताळा:-
- आहारात दररोज 1-2 फळांचा समावेश दोन खाण्यांमध्ये असावा.
- प्रत्येक खाण्यामध्ये प्रथिनांचा समावेश असावा. मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
-अॅसिडिटी वाढवणारे पदार्थ म्हणजेच जंक फूड, चीज, बटर, शेंगदाणे (अतिप्रमाणातील वापर), कॉफी, चहा, चॉकलेट, तळलेले व मसालेदार पदार्थ यांचा वापर टाळावा.
-जेवण बनवताना स्वयंपाकात आले , लसूण, सेलरी, घरचे साजूक तूप (२-३ चमचे), मुफायुक्त वनस्पती तेलाचा Monounsaturated fatty acids ( MUFA ) आरोग्यदायी फॅट समावेश करावा .
-हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेल्या रेडी टू - इट पदार्थांची पाकिटे घेणे टाळावे.
- वेळोवेळी आहारतज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Share your comments