यामुळे चेहरा विद्रुप दिसतोच मात्र त्वचेच्या बाह्य बाजूस व आतील बाजूस वेदनाही होतात. त्यामुळे अस्वस्थता वाढते.कारणे वयात येताना शरीरातील हार्मोन्समध्ये (तैलग्रंथी) होणारा बदल. कमी प्रमाणातील झोप, सतत होणारे अती जागरण.नेहमी मसालेदार, जंकफूडचे खानपान,मुलीमधे पाळीचे विकार, कोंडा, बद्दकोष्टता ई. यामुळे शरीराती उष्णता वाढून मुरुम व पुटकुळ्या चेहऱ्याच्या त्वचेवर येतात.साधारण ७० ते ८० टक्के तरुणपीढीमध्ये मुरुम तथा पुटकुळ्यांची समस्या आढळते. म्हणून या त्वचा आजाराला तारुण्यपिटीका असेही म्हणतात. इतर वयोगटातही ही समस्या दिसू शकते.
साधारणपणे मुरूम हे चेहेरा, पाठ, छाती व हातावर आढळतात. याचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे इन्फेक्शन (संसर्ग) आणि सौंदर्य प्रसाधनाच्या साधनातील (मेकअप किट) रसायने ही सुध्दा असतात.मुरुम हे तारुण्यात आढळतात व प्रौढावस्थेत ते नाहीसे होतात.मुरुमांमुळे शरीरावर काही परिणाम होत नाही मात्र त्यामुळे नैराश्य,न्यूनगंड निर्माण होतो. रुग्ण कुटुंबिय किंवा मित्रांच्या संपर्कातून लांब राहतो. चेहेऱ्यावर डाग व खड्डे पडण्याची रुग्णाला भीती असते.उपाय-चेहऱ्यावर मुरूम अथवा पुटकुळ्या येत असल्यास दिवसातून दोन वेळा (जास्त वेळा नको) चेहरा गरम पाण्याने तसेच सौम्य साबणाने स्वच्छ धुवा.
खेळून झाल्यावर रात्री किंवा पहाटे झोपायला कितीही उशीर झाला तरी मेकअप पूर्ण काढूनच झोपा.मुरुम व पुटकुळ्या टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे भरपूर (दररोज ३ ते ४ लिटर) पाणी पिणे, चौरस आहार घेणे, दिवसातून चेहेरा दोनतीन वेळा पाण्याने धुणे, फास्टफूड, चॉकलेट तसेच शीतपेय व तेलकट पदार्थ खाण्याचे टाळावे. चेहेऱ्यावरील मुरुमे हाताळू नयेत. ज्याने डाग व खड्डे टाळता येतात.यामुळे चेहरा विद्रुप दिसतोच मात्र त्वचेच्या बाह्य बाजूस व आतील बाजूस वेदनाही होतात. त्यामुळे अस्वस्थता वाढते.
मुरुम हे तारुण्यात आढळतात व प्रौढावस्थेत ते नाहीसे होतात.मुरुमांमुळे शरीरावर काही परिणाम होत नाही मात्र त्यामुळे नैराश्य, न्यूनगंड निर्माण होतो. रुग्ण कुटुंबिय किंवा मित्रांच्या संपर्कातून लांब राहतो. चेहेऱ्यावर डाग व खड्डे पडण्याची रुग्णाला भीती असते.उपाय-चेहऱ्यावर मुरूम अथवा पुटकुळ्या येत असल्यास दिवसातून दोन वेळा (जास्त वेळा नको) चेहरा गरम पाण्याने तसेच सौम्य साबणाने स्वच्छ धुवा. खेळून झाल्यावर रात्री किंवा पहाटे झोपायला कितीही उशीर झाला तरी मेकअप पूर्ण काढूनच झोपा.
Share your comments