केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. महाराष्ट्रात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याबाबत शासनाने आणखी एक दिलसादायक निर्णय घेतला आहे.
हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र (Balasaheb Thackeray Turmeric Research Centre) उभारले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. या संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 10 कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे.
सावधान! आज आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aaghadi government) 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे. हा शासानिर्णय 14 सप्टेंबला काढण्यात आला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल.
'या' सरकारी योजनेतुन वृद्धांना दरमहा 9 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन; असा करा अर्ज
चालू आर्थिक वर्षांमध्ये 10 कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र (Turmeric Research Centre) उभारले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Turmeric Research and Training Centre) या नावाने हे संशोधनं केंद्र उभारले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा
सावधान! 'या' कारणाने होऊ शकतो तुम्हाला डायबीटीस; अशी घ्या काळजी
शेवग्याला मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा भाव; जाणून घ्या इतर पालेभाज्यांचे बाजारभाव
Share your comments