भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांचे कायमच विविध पद्धतीने कृषी क्षेत्रावर लक्ष असून शेतकऱ्यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना किंवा अनेक प्रकारचे निर्णय राबविण्यात येतात. तसे पाहायला गेले तर समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या योजना आहेतच. परंतु कृषी क्षेत्राशी संबंधित देखील भरपूर प्रकारच्या योजना शासनाच्या आहेत.
नक्की वाचा:Loan: व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना ठरते एक आशेचा किरण,जाणून घेऊ थोडक्यात माहिती
शेती म्हटले म्हणजे शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच शेतीमध्ये कष्ट करत असतात यामध्ये महिला वर्गदेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत राबतात.या पार्श्वभूमीवर शासनाच्या काही योजना या महिला वर्गासाठी देखील आहेत.
जेणेकरून शासनाच्या योजनांचा फायदा महिलांना होऊन त्यांची आर्थिक प्रगती साधणे हा त्यामागील उद्दिष्ट आहे.या लेखामध्ये आपण अशाच एका उपयुक्त योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही खास करून महिलांसाठी आहे.
नक्की वाचा:जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना
आता रोपवाटिका म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रोपवाटिका अर्थात नर्सरी च्या माध्यमातून विविध प्रकारचे फळांची तसेच भाजीपाला वर्गीय पिकांची रोपे तयार केली जातात. कारण चांगल्या उत्पादनासाठी निरोगी आणि सक्षम रोपांची निर्मिती खूप महत्त्वाची असून हे रोपवाटिकेच्या माध्यमातून साध्य केले जाते.
आता आपण या योजनेचा विचार केला तर योजना खासकरून महिलांसाठी असून यामध्ये प्रथम प्राधान्य हे कृषी पदवीधर महिलांना देण्यात आले असून द्वितीय प्राधान्य हे कृषी पदविका असलेल्या महिलांना देण्यात आले आहे. तर तिसरे प्राधान्य हे महिला शेतकरी गट व त्यानंतर इतर लाभार्थी या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत.
या योजनेत कशा पद्धतीचा फायदा होतो?
या योजनेच्या माध्यमातून दहा गुंठे शेडनेट, दहा गुंठे पॉलीटनेल आणि 62 प्लास्टिक कॅरेट व पावर नॅपसेक स्प्रेयर आकारमानाच्या चार लाख 60 हजार प्रकल्प खर्चासाठी दोन लाख 30 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते.
लागणारी कागदपत्रे
तुम्हाला तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 7बारा -8अ चे उतारे, आधार कार्डची प्रत, आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत त्यासोबतच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असाल तर संवर्ग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Share your comments