1. सरकारी योजना

Loan: व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना ठरते एक आशेचा किरण,जाणून घेऊ थोडक्यात माहिती

आयुष्यात प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कर्जरूपाने पैसे उभे करावे लागतात. त्यातल्या त्यात व्यवसाय उभारायचा म्हटले म्हणजे सगळ्याच पैसा आपल्या घरचा असतो असं नसते. त्यामुळे आपल्याला बँकांचा आधार घ्यावा लागतो. तसेच यासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या उपयोगी योजनांची देखील मदत मिळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mudra scheme for set up bussiness

mudra scheme for set up bussiness

आयुष्यात प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कर्जरूपाने पैसे उभे करावे लागतात. त्यातल्या त्यात व्यवसाय उभारायचा म्हटले म्हणजे सगळ्याच पैसा आपल्या घरचा असतो असं नसते. त्यामुळे आपल्याला बँकांचा आधार घ्यावा लागतो. तसेच यासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या उपयोगी योजनांची देखील मदत मिळते.

यासाठी शासनाच्या खूप काही योजना आहेत. परंतु काही योजनांच्या बाबतीत बोलायचे झाले तर थोडेसे कठीण वाटेल अशी कर्ज मंजुरीची पद्धत सदर योजनांची आहे.

परंतु शहरी भाग असो की ग्रामीण भाग यामध्ये केंद्र सरकारचे प्रधानमंत्री मुद्रा योजना व्यवसायिक कर्ज मिळण्यासाठी खूप सोयीस्कर असून सहजरीत्या या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध केले जाते.

नक्की वाचा:Bussiness Tips: भरपूर मागणी असणारा व्यवसाय आणि कमी गुंतवणूक,कमाई मात्र प्रतिमाह लाखात

 या योजनेचे एकंदरीत स्वरूप

मुद्रा योजनेचा प्रकल्प अहवालानुसार,तुम्ही उभारत असलेल्या व्यवसायाचा जो काही एकूण खर्च असेल त्या खर्चाच्या 80 टक्‍क्‍यांपर्यंत कर्जाची सुविधा या माध्यमातून उपलब्ध केली जाते व सुलभ हप्त्यामध्ये हे कर्ज  प्राप्त होते. या योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

आपल्याला माहित आहेच कि 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. तुम्हाला जो काही व्यवसाय सुरु करायचा असेल त्यामध्ये तुम्हाला एकूण खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागते. 

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमचा व्यवसायाचा एकूण खर्च दहा लाख रुपये असेल तर तुम्हाला यामध्ये स्वतःची अडीच लाख रुपये रक्कम गुंतवावी लागेल व उरलेली रक्कम केंद्रसरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात देते.

यामध्ये जे काही कर्ज दिले जाते त्याचे दोन प्रकार असून एक म्हणजे मुदत भांडवली कर्ज आणि दुसरे म्हणजे कार्यरत भांडवल कर्जाचा समावेश होतो.

नक्की वाचा:दिलासादायक! प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातील जाचक अटी रद्द, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मिळणार फायदा

मुदत कर्ज साडे सात लाख रुपये व खेळते भांडवलकर्ज हे चार लाख 16 हजार रुपये दिले जाते.

यामध्ये तुम्हाला संबंधित व्यवसाय मध्ये लागणारी यंत्रसामग्री, लागणारा कच्चामाल तसेच कर्मचाऱ्यांचे पगार,वाहतूक तसेच वीजबिल व कर यांचा समावेश होतो.

 मुद्रा लोनचा फायदा कसा घ्यावा?

 यासाठी तुम्ही कोणत्याही बॅंकेमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता,तुमच्या व्यवसायाचा पत्ता तसेच शिक्षण व सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे

त्याचा तपशील द्यावा लागतो. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. तुम्ही घेतलेली कर्जाची रक्कम तुम्हाला पाच वर्षात परतफेड करावी लागते.

नक्की वाचा:महत्वाचे! 'या' योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर माहिती

English Summary: pm mudra scheme is so benificial for set up capital for bussiness Published on: 05 September 2022, 03:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters