1. सरकारी योजना

Loan News:10 म्हशिंची डेअरी उघडा आणि 'या' योजनेच्या माध्यमातून मिळवा 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

जर तुम्हाला डेअरी उघडून स्वतःचा रोजगार करायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. एक योजना आहे, ज्यामध्ये 10 म्हशिंची डेअरी उघडण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
government scheme for dairy business

government scheme for dairy business

जर तुम्हाला डेअरी उघडून स्वतःचा रोजगार करायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. एक योजना आहे, ज्यामध्ये 10 म्हशिंची डेअरी उघडण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

दुधाच्या उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे आणि इथे दुग्धोत्पादन हे खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. भारत सरकार दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी 'डेअरी उद्योजक विकास योजना' यासारख्या अनेक योजना राबवत आहे.

 या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो. तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचा रोजगार सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत बँकेकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

नक्की वाचा:बांबू लागवड ठरेल फायद्याची! 24 औष्णिक विद्युत केंद्रात 'बांबूचा बायोमास' वापरण्यास राज्य सरकारची परवानगी

1) डेअरी उद्योजक विकास योजना काय आहे?

 भारतातील दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि पशुपालनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे दुग्धउद्योग विकास योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत 10 म्हशिंचे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. याशिवाय शासनाकडून योजनेवर अनुदानही दिले जाते. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 रोजी ही योजना सुरू केली.

2) दुग्धउद्योजक विकास योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे?

 या योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी, तुम्हाला व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका,राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल.

जर कर्जाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराला त्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे गहाण  ठेवावी लागतील.

नक्की वाचा:ड्रोन सबसिडी: 'या'सर्वोत्तम कृषी ड्रोनवर मिळू शकते तुम्हाला 100% सबसिडी, वाचा सविस्तर माहिती

3) बँकेचे कर्ज घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक असतील :-

1) सर्वप्रथम, अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

2) पॅनकार्डही असायला हवे.

3) तुम्ही मागास जातीचे असाल तर अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र ही असायला हवे.

4) अर्जदाराच्या खात्याचा रद्द केलेला चेक असावा.

5) या सर्वांशिवायएक प्रमाणपत्रही सादर करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत नसल्याचे कळू शकेल.

4) बँकेच्या कर्जावर सबसीडी :-

 डेअरी उद्योजक विकास योजनेअंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील दुग्धशाळा चालकांना 25% अनुदान दिले जाणार आहे.

तर महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 33%अनुदान दिले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की यामध्ये तुम्हाला फक्त 10 टक्के पैसे स्वतः गुंतवावे लागतील आणि उर्वरित 90 टक्के रक्कम बँक कर्ज आणि सरकारकडून सबसिडी दिली जाईल.

नक्की वाचा:Udyog Tips:बिटवर करा प्रक्रिया आणि बनवा 'हे' तीन पदार्थ, मिळेल भरपूर नफा

English Summary: this is important scheme for dairy business get through 7 lakh loan for dairy Published on: 08 July 2022, 03:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters