1. सरकारी योजना

Kanda Chal Anudan: अशाप्रकारे मिळते कांदा चाळ अनुदान! वाचा कोणत्या आकारमानाच्या चाळीला किती मिळेल अनुदान?

Kanda Chal Anudan :- महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो आणि देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ या नाशिक जिल्ह्यामध्येच आहेत. जर आपण कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर कायमच कांदा दराच्या बाबतीत बाजारपेठेत अस्थिरता असते. त्यामुळे काही शेतकरी कांदा साठवणुकीवर मोठ्या प्रमाणावर भर देतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kanda chal subsidy

kanda chal subsidy

Kanda Chal Anudan :- महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो आणि देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ या नाशिक जिल्ह्यामध्येच आहेत. जर आपण कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर कायमच कांदा दराच्या बाबतीत बाजारपेठेत अस्थिरता असते. त्यामुळे काही शेतकरी कांदा साठवणुकीवर मोठ्या प्रमाणावर भर देतात.

परंतु कांदा साठवण्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची कांदा चाळ उभारणे खूप गरजेचे असते. जर आत्ताच्या परिस्थितीत आपण विचार केला तर एक चांगली आणि अत्याधुनिक अशी कांदा चाळ उभारणी करिता खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हा खर्च परवडेल अशी स्थिती नसते. त्यामुळे ही समस्या ओळखून शासनाच्या माध्यमातून कांदा चाळ उभारणी करिता अनुदान दिले जाते. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये कांदा चाळ अनुदानाविषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 कांदा चाळ अनुदान

 शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे योजना राबवल्या जात असून अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. अशाप्रकारे आपण बघितले तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे खूप महत्त्वपूर्ण असे अभियान असून या माध्यमातून शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणी करिता  अनुदान दिले जाते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत वैयक्तिक शेतकरी तसेच कांदा लागवड करणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

 कांदा चाळ अनुदानासाठी ही कागदपत्रे लागतात

 तुम्हाला देखील कांदा चाळ अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना अर्जासोबत तुम्हाला सातबारा उतारा, आठ चा नमुना, लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड, आधार लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुकचे पहिल्या पानाची छायांकित प्रत, हमी पत्र, शेतकरी जर राखीव प्रवर्गातील असतील तर अशांकरिता जातीचा दाखला( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता ) इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 कांदा चाळीचे आकारमान त्यानुसार मिळणारे अनुदान

1- पाच मॅट्रिक टन आकारमानाची कांदा चाळ- याकरिता एकूण प्रकल्प खर्च हा प्रति चौरस मीटरला 35 हजार रुपये येतो व या आकारमानाच्या कांदा चाळीकरिता सतरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते.

2- दहा मॅट्रिक टन आकारमानाची कांदा चाळ- याकरिता एकूण प्रकल्प खर्च प्रति चौरस मीटरला 70 हजार रुपये येतो व याकरिता 35 हजार रुपये अनुदान दिले जाते.

3- 15 मॅट्रिक टन आकारमानाची कांदा चाळ- याकरिता एकूण प्रकल्प खर्च हा प्रति चौरस मीटर ला एक लाख पाच हजार इतका येतो. याकरिता 52 हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते.

4- वीस मेट्रिक टन कांदा चाळ- आकारमानाच्या कांदा चाळीकरिता एक लाख 40 हजार रुपये प्रकल्प खर्च हा प्रति चौरस मीटर ला येतो. याकरिता 70 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

5- 25 मॅट्रिक टन कांदा चाळ- याकरिता एकूण प्रकल्प खर्च हा प्रती चौरस मीटर एक लाख 75 हजार रुपये इतका येतो याकरिता 87 हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाते.

 या संकेतस्थळावर करावा अर्ज

 तुम्हाला देखील या अभियानांतर्गत कांदा चाळीकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही mhabdtmahait.gov.in संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

 अधिक माहितीसाठी या ठिकाणी साधा संपर्क

  कांदा चाळ अनुदानाची अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात.

English Summary: This is how you get onion chawl subsidy! Read how much subsidy will be given to a chawl of what size? Published on: 30 August 2023, 07:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters