1. सरकारी योजना

सौर कृषी पंप योजना 2022: या योजनेच्या माध्यमातून 3,5 आणि 7.5 एचपीच्या पंपाची किंमत किती असते? शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात?

शेतातील कृषी पंपांच्या बाबतीत आपण विचार केला तर विजेचा पुरवठा अनियमित आणि तोही वेळेवर न झाल्यामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कल आता सोलर कृषी पंप वापरण्याकडे मोठ्या प्रमाणात आहे.यासाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. परंतु या अर्ज करताना बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फसव्या लिंकच्या माध्यमातून शेतकरी बंधूंची फसवणूक करण्यात येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
solar krushi pump update

solar krushi pump update

 शेतातील कृषी पंपांच्या बाबतीत आपण विचार केला तर विजेचा पुरवठा अनियमित आणि तोही वेळेवर न झाल्यामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कल आता सोलर कृषी पंप वापरण्याकडे मोठ्या प्रमाणात आहे.यासाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. परंतु या अर्ज करताना बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फसव्या लिंकच्या माध्यमातून शेतकरी बंधूंची फसवणूक करण्यात येते.

त्यामुळे शेतकरी बंधूंनी कोणत्याही अनोळखी लिंकच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू नये अशा स्वरूपाचे  आव्हान देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तुम्हाला जर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी mhaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. केवळ हीच साईट या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे.

 सौर कृषी पंपाचे फायदे

 बऱ्याचदा पिक जोमात असते आणि हाता तोंडाशी घास आलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देता येत नाही व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. परंतु सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून  सौर कृषी पंप बसवल्यास  पिकांना आवश्यक तेव्हा पाण्याचा पुरवठा करता येणे शक्य होते.

या योजनेच्या माध्यमातून अनुदानावर सोलर पंप घेणे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरते. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के इतका स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे आहे.

 या योजनेमध्ये असलेल्या सौर कृषी पंपांची एचपीनिहाय किंमत

1- तीन एचपी डीसी पंपाची किंमत - तीन एचपी पंपाची किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये आहे.

2- पाच एचपी पंपाची किंमत- पाच एचपी च्या सौर कृषी पंपाची किंमत दोन लाख 69 हजार 746 रुपये.

3- साडेसात एचपी पंपाची किंमत- सौर कृषी पंपाची किंमत 3 लाख 74 हजार  402 रुपये आहे.

शेतकऱ्यांना भरावा लागतो इतका लाभार्थी हिस्सा

1- 3 एचपी सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला १९३८० रुपये आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला 9690 रुपये भरणे आवश्यक आहे.

2- पाच एचपी च्या सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला 26 हजार 975 रुपये तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला 13488 रुपये भरावे लागतात.

3- साडेसात एचपी च्या सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला 37 हजार 440 आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 18720 रुपये भरावे लागतात.

English Summary: solar krushi pump yojna is benificial for farmer read solar pump price here Published on: 17 December 2022, 07:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters