1. सरकारी योजना

Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकार देणार शेतकऱ्यांना महिन्याला 3 हजार, असा करा अर्ज

Sarkari Yojana : मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) आधारित आहे. यामुळे आपल्या देशाला कृषिप्रधान देशाचा (Agricultural Country) तमगा प्राप्त आहे. निश्चितच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो देशाची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आधारित असल्याने मायबाप शासन (Government) देखील शेतकऱ्यांच्या (Farmer) हितासाठी आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pm kisan mandhan scheme

pm kisan mandhan scheme

Sarkari Yojana : मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) आधारित आहे. यामुळे आपल्या देशाला कृषिप्रधान देशाचा (Agricultural Country) तमगा प्राप्त आहे. निश्चितच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मित्रांनो देशाची अर्थव्यवस्था शेतीवर (Agriculture) आधारित असल्याने मायबाप शासन (Government) देखील शेतकऱ्यांच्या (Farmer) हितासाठी आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना (Farmer Scheme) कार्यान्वित करत असते.

2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकरी हिताच्या अनेक योजना संपूर्ण भारत वर्षात चालू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सम्मान निधि योजनेचा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त पीएम किसान मानधन योजना हीदेखील केंद्राची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पेन्शन देण्याची सोय शासनाकडून करण्यात आली आहे. या योजनेत शेतकरी बांधवांनी ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यांना म्हातारपणात पेन्शनची सोय सरकारकडून करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण पीएम किसान मानधन योजनेसाठी कसा अर्ज करायचा याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. सरकारने आखलेली 'PM किसान मानधन योजना' ही लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी तयार केलेली पेन्शन योजना आहे.

या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील शेतकरी आपली नोंदणी करू शकतात. त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये सरकारी खात्यात जमा करावे लागतात. ते त्यांच्या वयानुसार असेल. हे हप्ते वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागतील आणि त्यानंतर ते आपोआप थांबतील. यानंतर या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.

पीएम किसान मानधन योजनेसाठी नोंदणी कशी करावी

कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करा

आधार कार्ड आणि खसरा-खतौनीची प्रत जमा करा

 2 फोटो आणि बँक पासबुक देखील आवश्यक असेल

हे सर्व तपशील सबमिट केल्यानंतर आणि दिल्यानंतर, शेतकऱ्याचा युनिक पेन्शन नंबर आणि पेन्शन कार्ड तयार होईल.

English Summary: sarkari yojana pm kisan mandhan scheme marathi Published on: 16 September 2022, 11:45 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters