केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. आता शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी (Government purchase of paddy) विक्रीसाठी नोंदणी करता यावी यासाठी शासनाने 41 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू केली आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री (Sales at the shopping center) करायचे आहे, ते शेतकरी विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यात 41 ठिकाणी नोंदणी केंद्र सुरु केली आहेत. शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांना नोंदणीसाठी शासनाकडून 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.एस. देसाई यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! नांदेड जिल्ह्यात लम्पीमुळे 27 जनावरांचा मृत्यू
ही धान खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Online method) करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी चालु खरीप हंगाम 2022-23 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मुळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्सची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकरी स्वत: उपस्थित राहणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस व्दारे खरेदी करिता बोलविण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष धानाची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यावर खरेदीची रक्कम जमा केली जाईल.
मेष राशीने अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा; जाणून घ्या संपूर्ण राशीचे राशीभविष्य
शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सातबारा मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री देसाई यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
लम्पी प्रादुर्भाव! जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता तसेच धूर फवारणीची जनजागृती आता शिक्षकांवर
शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न
शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल
Share your comments