गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे सरकारकडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना आता वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. आता तुम्हाला एका वर्षात 3 गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) मिळण्याची संधी आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही.
आता शिधापत्रिकाधारकांना (Ration card holders) आधी मोफत रेशन आणि आता मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता जर तुम्ही अंत्योदय कार्डचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. आता सरकारकडून तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. शिधापत्रिकाधारकांना वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.
याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. यामध्ये काही अटी व नियम देखील आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला सिलिंडर मिळू शकेल. सध्या फक्त उत्तराखंडमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे, येणाऱ्या काळात संपूर्ण देशात ही योजना सुरु करण्यात येणार आहे. यामुळे आता हा लाभार्थी उत्तराखंडचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.यासाठी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांचे गॅस कनेक्शन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
लाकडी- निंबोडी योजनेला कायमस्वरूपी बंदी? मुख्यमंत्र्यांना निवेदन
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये तुमचे अंत्योदय कार्ड लिंक करून घ्या. जर तुम्ही या दोन्ही लिंक जोडल्या नाहीत तर तुम्ही सरकारच्या मोफत गॅस सिलिंडरच्या योजनेपासून वंचित राहाल. याबाबत सरकारने माहिती दिली आहे. याअंतर्गत जिल्हानिहाय अंत्योदय ग्राहकांची यादीही स्थानिक गॅस एजन्सींना पाठवण्यात आली असून अंत्योदय कार्डधारकांच्या शिधापत्रिकाधारकांना गॅस कनेक्शन लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच ही योजना देशभरात लागू होईल.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेणापासून कागद आणि लाकूड बनवण्याचा व्यवसाय करा सुरु, मिळेल बक्कळ पैसा..
तरुणांनो सोलरचा उद्योग करा सुरु, भविष्याचा वेध घेतला तर आख्ख मार्केट तुमचं होईल
शेतकऱ्यांना 1 जुलैला 50 हजार मिळणार होते, सरकार बदलले आणि सगळा घोळच झाला..
Share your comments