केंद्र सरकार ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे, ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना चांगला होऊ शकतो. पोस्ट ऑफिस स्कीम असल्याने यामध्ये पैसे सुरक्षित देखील राहतात.
आपण सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम बद्दल बोलत आहोत. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेत व्हीआरएस घेतलेल्या नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेल्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जात आहे.
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2022 पासून या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. पूर्वी 7.4 टक्के व्याज मिळायचे. आता ते 7.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही योजना उत्तम परतावा देत आहे.
'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कशी कराल गुंतवणूक?
सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकतात. यासह ज्या व्यक्तींनी नागरी क्षेत्रातील सरकारी पदांवरून VRS घेतले आहे, ज्यांचे वय 55 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे.
तसेच जे संरक्षण क्षेत्रातून म्हणजे लष्कर, हवाई दल, नौदल आणि इतर सुरक्षा दलांमधून निवृत्त झाले आहेत ते देखील ५० ते ६० वर्षांच्या वयातही या योजनेअंतर्गत सिंगल अथवा जॉईंट खाते उघडू शकतात. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे. यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते.
कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी
एफडीपेक्षा अधिक व्याज
या योजनेत ज्येष्ठ नागरिक किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी, कमाल 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूकदारांना 7.6 टक्के व्याजदर मिळतो. साधारणपणे, बहुतांश बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के ते 7 टक्के व्याजदर देत आहेत.
अशा परिस्थितीत, ते बँकांच्या एफडीपेक्षा खूप जास्त व्याज देते. दुसरीकडे, भारतातील महागाई दराकडे पाहिले तर तो सध्या 7 टक्के आहे. अशा परिस्थितीत महागाईनुसार चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही.
महत्वाच्या बातम्या
डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या घरगुती उपायांचा करा वापर; जाणून घ्या
मिश्र मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; होईल लाखों रुपयांचे कमाई
गांडूळ खत निर्मितीसाठी या पद्धतींचा वापर करा; खर्च आणि वेळेची होईल बचत
Share your comments