1. सरकारी योजना

PM kisan Yojana : ठरलं तर ! 'या' तारखेला खात्यात येणार 2 हजार रुपये

मोदी सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पीएम किसान योजना (PM kisan Yojana) सुरु केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतात. आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत.

PM kisan Yojana

PM kisan Yojana

मोदी सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पीएम किसान योजना (PM kisan Yojana) सुरु केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतात. आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत.

या महिन्यात 11 वा हप्ता येऊ शकतो

जानेवारी महिन्यात पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता जमा झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती ११ व्या हप्त्याची. सरकार 31 मे 2022 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता जारी करेल.

31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता येऊ शकतो. पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान, दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै आणि वर्षातील तिसरा किंवा शेवटचा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो.

IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट

E-KYC दोन प्रकारे करता येते

PM किसान खात्याचे E-KYC दोन प्रकारे केले जाऊ शकते. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन शेतकरी त्यांचे खाते KYC करून घेऊ शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. त्याच वेळी, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन E-KYC देखील करू शकता.

ठाकरे सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिळणार मोफत ट्रॅक्टर

घरी बसून असे E-KYC करा

यासाठी सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी प्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. यानंतर, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या E-KYC पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे टाकावा लागेल. यानंतर तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP टाकून तुम्हाला तो सबमिट करावा लागेल. तुमच्या स्क्रीनवर 'यशस्वीपणे सबमिट करा' असा संदेश येताच तुमची 'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण होईल.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना प्रत्येकी वीस हजार अर्थात 10 हप्ते देण्यात आले आहेत. देशातील एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

जमिनीचा NA म्हणजे नक्की काय? NA कसा करतात; जाणून घ्या...

English Summary: PM kisan Yojana: If so! Rs 2,000 will be credited to the account on this date Published on: 18 May 2022, 10:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters