नवी मुंबई: मित्रांनो देशातील कोट्यावधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे (Pm Kisan Yojana) पात्र शेतकरी बांधव पीएम किसानच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतं आहे हाती आलेल्या माहितीनुसार, आता या योजनेच्या कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
खरं तर, अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पीएम किसानचा 11 वा हप्ता कधी येणार याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. मित्रांनो केंद्रीय कृषिमंत्री यांच्या मते, पीएम किसानचे पैसे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान नेहमी येतं असतात.
यादरम्यान या योजनेच्या पैशांची अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मध्य प्रदेशमध्ये आयोजित एका कृषी कार्यक्रमात 11 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली. यामुळे निश्चितच देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लवकरच 2 हजार रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्यप्रदेश मध्ये आयोजित या कार्यक्रमात कृषिमंत्री सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 'पीएम किसान सन्मान निधी योजना' सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.
लई भारी! नोकरीला लाथ मारली अन शेती सुरु केली; आज करतोय चांगली कमाई
31 मे रोजी पैसे येतील:
किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता 31 मे रोजी पाठवला जाईल, असे कृषीमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी 2021 मध्ये 15 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी हप्त्याची वाट पाहत आहेत.
निलगिरी लागवड शेतकऱ्यांना बनवेल मालामाल; वाचा याविषयी
ई-केवायसी करणे आवश्यक आहे:
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यावेळी 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेसाठी संपूर्ण देशभरातील सुमारे साडे बारा कोटीं शेतकरी पात्र आहेत यापैकी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरीही ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेसाठी केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन देखील यावेळी केले गेले आहे.
कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेमार्फत सर्व्यांना मिळणार वार्षिक 36 हजार; वाचा या विषयी
Share your comments