केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना. पीक विमा योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्त्यामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच 4 महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकरी 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे नियोजन करत आहे. माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत किंवा नवरात्रीच्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Scheme) ज्या शेतकऱ्यांनी इ-केवायसी केली आहे त्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. पैसे पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जमा करा फक्त 95 रुपये; 14 लाख रुपयांचा होईल फायदा
आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांनी घेतला आहे. परंतु जे अपात्र आहेत असे शेतकरी लाभ घेत असल्याचे निदर्शणास आले असून त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे 12 व्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्या कमी दिसणार आहे.
अल्पभूधारक आणि गरजवंत शेतकऱ्य़ांनाच (farmers) योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले त्यांच्याच खात्यावर 12 व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अनेकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेत पारदर्शकता रहावी यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशनवर होणार आधार कार्ड संबंधित महत्वाची कामे; UIDAI ने आखली मोठी योजना
शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांकही दिला आहे. 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तर pmkisan-ict@gov.in यावर देखील मेल करू शकता.
महत्वाच्या बातम्या
सावधान! या लोकांसाठी ठरू शकतो अडचणींचा काळ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया
शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन
Share your comments