केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना संपूर्ण देशात लागू केल्या आहेत. यापैकीच एक योजना आहे (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात सहा हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाते. या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये केंद्रामार्फत दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागत असतो.
IMPORTANT NEWS : आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना फक्त 6 हजारच नाही तर 36 हजार रुपये मिळतील; मात्र हे काम करावे लागेल
मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे की, आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत, तर आता शेतकरी 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता (11th installment of PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया देखील शासन दरबारी पूर्ण केली केली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारला पाठवली आहे. या 11व्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत.
Important News : मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन
11व्या हप्त्यासाठी ई-केवायसी आवश्यक- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि ई-केवायसी (E-KYC) करण्यासाठी शासनाने 31 मार्च जी शेवटची तारीख ठरवली होती त्यामध्ये मुदतवाढ दिली असून 31 मे पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना अवधी देण्यात आली आहे. मात्र जर शेतकऱ्यानी ई-केवायसी केली नाही तर दोन हजार रुपयांच्या हप्त्यापासून अशा शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेचे पात्र शेतकरी दोन प्रकारे ई-केवायसी करू शकतात. एक तर आधार कार्ड आणि OTP द्वारे आणि दुसरे जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने. मात्र, काही दिवसांपूर्वी शासनाने पहिला प्रकार बंद केला होता.
यामुळे केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्रा वर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा शासनाने आधार कार्ड ओटीपीद्वारे मोबाईलच्या मार्फत ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Important News : बातमी कामाची! डेअरी फार्म उभारण्यासाठी मिळणार 'इतके' अनुदान; येथे करा अर्ज
Share your comments