शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले आहेत. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. मात्र, त्याचा शासन निर्णय काढला नव्हता.
असे असताना आता राज्य शासनाने शासन निर्णय काढला. त्यामुळ आता शेतकऱ्यांना केवळ १ रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
आता कृषी विभागाने पीक विमा योजना लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त १ रुपयामध्ये ५ प्रकारच्या नुकसानाचा लाभ घेता येणार आहे.
अंबादास दानवे थेट कृषी केंद्रात! योग्य दरात बियाणे, खतांची विक्रीचे करण्याचे निर्देश...
आता त्यासाठी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के हिस्सा द्यावा लागतो.
पण आता सर्वसमावेशक पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनो जमिनीची सुपीकता कशी वाढवावी?, जाणून घ्या...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान
अखेर पावसाने राज्याला भिजवले, राज्यभर पावसाला सुरुवात..
Share your comments