सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी प्रयत्नशील असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याचदा योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. तर कधी नियम अटी जास्त असल्यामुळे शेतकरी योजनांकडे पाठ फिरवतात. या नियम अटींमुळे शेतकरी कर्जाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींवर केंद्र सरकारने आता मार्ग शोधला आहे.
केंद्राची किसान क्रेडिट कार्ड अर्थात KCC योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना कमी व्याजदरात लाभ घेता यावा हा उद्देश आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया अधिकच सोपी आहे. कारण या शेतकऱ्यांची आवश्यक असणारी सर्व माहिती बॅंकामध्ये पूर्वीपासूनच असणार. त्यामुळे KCC च्या माध्यमातून आता कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.
शेतकऱ्यांना आता एक पानाचा फॉर्म आणि तीन कागदपत्रांच्या बदल्यात 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे संबंधित व्यक्तीची जर दोन आठवड्यात कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर शेतकरी बॅंक अधिकाऱ्याबद्दल तक्रार नोंदवू शकतात.
KCC साठी आवश्यक कागदपत्रे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट यापैकी एकाची प्रत द्यावी लागणार तर पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड यापैकी एकाची प्रत द्यावी लागणार. लाभार्थी हा शेतकरीच आहे याची ओळख पटवून देण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ याच्या प्रतिही द्याव्या लागणार आहेत. तसेच संबंधित शेतकरी दुसऱ्या बॅंकेचा कर्जदार नसणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र त्याला द्यावे लागणार आहे.
आता 'ई-चावडी' उपक्रम ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान; राज्य सरकारचा मोठा निर्णय
जाणून घ्या कर्जाची प्रक्रिया
सर्वात प्रथम शेतकऱ्यांना बॅंकेत अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासह केवळ ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि केसीसी कार्डची झेरॉक्स प्रत जमा करावी लागणार आहे. तसेच पासपोर्ट साईजचे दोन फोटोही द्यावे लागणार आहेत. तसेच अन्य कोणत्याही बॅंकेचे कर्ज नसल्याचा अहवाल द्यावा लागणार, शेती, पशुपालन आणि मत्स्यशेतीशी संबंधित कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एवढंच नाही तर सामूहिक शेती, पट्टेदार, भागधारक आणि स्वयंसहाय्यता गटही याचा लाभ घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; 'या' जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी, पुढील ५ दिवस महत्वाचे
'मधमाशी मित्र' तयार करण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम; रोजगारही होणार उपलब्ध
Share your comments