राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकाचे खूप नुकसान झाले. याच पार्शवभूमीवर अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा देखील केली आहे. ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
कधी होणार खात्यात पैसे जमा?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून ही रक्कम जमा केली जाणार आहे. असे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटणार असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक (Bank) खात्यामध्ये जमा होणार आहेत.
जुलैमध्ये नुकसान होऊन देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना (farmers) एक रुपयाही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा याची मागणी केली. विरोधकांनी देखील हा मुद्दा पावसाळी अधिवेशनामध्ये मांडला होता. आता अखेर दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे असे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनो किसान क्रेडिट कार्ड मिळवा घरबसल्या; जाणून घ्या सोपा मार्ग
जून ते ऑगस्ट यादरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला यामुळे खरीप हंगामातील पिकांचे (crops) खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. यावर शासनाने पंचनामे केले. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली.
राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' राबविली जाणार; शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 6 हजार रुपये
राज्यातील तब्बल 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर एका शेतकऱ्यास (farmers) 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
सोने तब्बल 5323 रुपयांनी स्वस्त; आता 10 ग्रॅम सोने मिळणार फक्त 29706 रुपयांमध्ये
महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा
कसा जाईल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य काय सांगते
Share your comments