केंद्र सरकारच्या विविध समाजघटकांसाठी वेगळ्या प्रकारच्या फायदेशीर योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न असतो की समाजातील सर्वच घटकांना जीवन जगत असताना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हे होय. परंतु शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये निरंतर काही बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या बदलानुसार योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळ्यांनी काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.
आता आपल्याला सगळ्यांना अटल पेन्शन योजना माहिती आहे.परंतु आता या योजनेमध्ये एक बदल करण्यात आला असून जे लोक आयकर भरतात अशांसाठी आता या योजनेचे फायदे बंद करण्यात येणार आहेत.
नक्की वाचा:सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत जमा करा 500 रुपये आणि मिळवा 40 लाख रुपयांचा लाभ
अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून साठ वर्षानंतर नाममात्र रक्कम जमा करून हमी पेन्शन मिळते. या योजनेच्या माध्यमातून ठेवीदाराला कमीत कमी मासिक हजार रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार म्हणजेच वर्षाला 60 हजार रुपये जमा करण्याची संधी मिळते.
परंतु तुम्ही जर करदाते असाल आणि साठ वर्षानंतर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंतची मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी 30 सप्टेंबर किंवा एक ऑक्टोबरच्या आधी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये संधी मिळणार नाही.
काय आहेत या योजनेचे फायदे?
या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्य पेन्शन दिली जाते. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला( किंवा पती) यांना पेन्शन प्रमाणे रक्कम दिली जाते.
परंतु यामध्ये जर दोघांचे निधन झाले तर नॉमिनीला योजनेच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम परत केली जाते. यामधील आकडेवारी पाहिली तर तीस वर्षे वयाची व्यक्ती तीस वर्ष प्रतिमहा 577 रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार 924 रुपये जर भरत राहिले तर त्याला साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह पाच हजार रुपये म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जातो.
या योजनेतील वय आणि गुंतवणुकीचा परस्पर संबंध
समजा तुमच्या वय चाळीस वर्षाच्या जवळपासच असेल व तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करण्याचे कमाल वय 40 वर्षे आहे याचा अर्थात तुम्ही वयाच्या 40 वर्ष आणि 364 दिवसांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता.
चाळीस वर्षे वयाच्या व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल तर त्या व्यक्तीला 20 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात. परंतु यामध्ये पाच हजार रुपयाची पेन्शन तुम्हाला मिळवायचे असेल तर प्रतिमहा 1454 रुपये तुम्हाला जमा करावे लागतील.
नक्की वाचा:Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम
Share your comments