अनेकदा सरकारी योजनांची माहिती नेमकी कुठे मिळवायची हेच कळत नाही. उमंग अॅप आहे जे तुम्हाला मदत करू शकते. केंद्र सरकारने सुरू केलेले उमंग अॅप तुम्हाला मदत करू शकते. उमंग अॅप हे एक बहुउद्देशीय अॅप आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एका क्लिकवर विविध सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता. डिटीटल पेमेंटपासून ते इन्कम टॅक्स रिटर्न, आधार कार्ड सेवा, ईपीएफओ माहिती यासारख्या अनेक योजनांचा लाभ येथे मिळेल. तसेच गॅस सिलेंडरपासून पासपोर्ट सेवेसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल.
उमंग अॅप नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय (NeGD) आणि माहिती तंत्रज्ञान यांनी विकसित केले आहे. या अंतर्गत वापरकर्ते स्वतःची नोंदणी करून विविध सुविधांची माहिती मिळवू शकतात. उमंग अॅप हे सरकारने विकसित केलेले मोबाइल अॅप आहे, जे सर्व-इन-वन सिंगल, युनिफाइड, सुरक्षित, मल्टी-चॅनल, मल्टी-प्लॅटफॉर्म, बहु-भाषा प्रदान करते. या अॅपद्वारे तुम्ही एम किसान, CBAC आणि इतर सर्व सरकारी सुविधांसारख्या १२७ विभागातील सुविधांचा लाभ घेऊ शकता.
- सर्वात आधी प्ले स्टोरवरुन Umang App डाउनलोड करावं लागेल.
- त्यानंतर लॉगइन करावं लागेल.
- रजिस्टर्ड करुन प्रोसीड करावं लागेल.
- आता मोबाइल नंबर टाकून mPin सेट करा.
- प्रोफाइल इन्फॉर्मेशन स्क्रिनवर क्लिक करा.
- इथे हवी असलेली सर्व माहिती भरा.
- Save and Proceed वर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.
- त्यानंतर तुम्ही e-KYC प्रोसेसही पूर्ण करू शकता.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! थेट बैलगाडीतून काढली वरात
साखर आयुक्तांचा मायक्रो प्लान! अतिरिक्त ऊस गाळपासाठी साखर आयुक्तांनी बनवला हा मायक्रो प्लान
Share your comments