केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतं. यामधील पीएम किसान निधी योजना (PM Kisan Nidhi Yojana) ही सर्वोत्कृष्ट योजना ठरत आहे. या योजनेबाबद एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank account) जमा होतात. मात्र आता या हफ्त्याची रक्कम वाढवण्यात येणार असल्याचे समजत आहे.
माहितीनुसार सरकार कोणत्याही दिवशी हप्त्याची रक्कम दुप्पट करून हप्ता 4,000 रुपयांचा होणार आहे. यामुळे जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने (government) अधिकृतपणे हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा केलेली नाही, परंतु सर्व माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये हा दावा केला जात आहे.
हे ही वाचा
irrigation: सरकारची भन्नाट ऑफर; शेतातील सिंचनासाठी विजेची गरज पडणार नाही
वर्षाला इतकी रक्कम मिळणार
पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये येतात. आता ही रक्कम 4,000 रुपयांपर्यंत वाढली, तर दरवर्षी 12,000 रुपये येऊ लागणार.
आतापर्यंत 11 हप्त्यांचा लाभ मिळाला
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले आहेत. केंद्र सरकारच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. आता हप्त्याची रक्कम 4,000 रुपये निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12,000 रुपये खात्यात येतील.
हे ही वाचा
शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस; पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम
तुमचे नाव असे तपासा
1) सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावा.
2) पुढे तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तिथे लाभार्थी यादी पर्याय निवडा.
3) आता फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्याचे नाव, नंतर जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
4) विनंती केलेली सर्व माहिती भरल्यानंतर get report वर जावा.
5) पुढे तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.
6) यानंतर तुम्हाला 'सबमिट' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय
पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान
Future Numerology: या व्यक्तींच्या आयुष्यात येणार वळण; अंकशास्त्रानुसार पहा तुमचं भविष्य
Share your comments