1. सरकारी योजना

'या' सरकारी योजनेत 2 लाख गुंतवणूक करून मिळवा 4 लाख; वाचा याविषयी

देशातील गरिबांच्या हितासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणुन केंद्र सरकार (Central Government) अनेक प्रकारच्या सरकारी योजना (Governement Scheme) सुरू करत असते. अशीच एक योजना आहे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojna).

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
invest 2 lakh and get 4 lakh

invest 2 lakh and get 4 lakh

देशातील गरिबांच्या हितासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणुन केंद्र सरकार (Central Government) अनेक प्रकारच्या सरकारी योजना (Governement Scheme) सुरू करत असते. अशीच एक योजना आहे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojna).

या योजनेत तुम्हाला काही वर्षांत दुप्पट पैसे मिळतात. यासोबतच तुमच्या पैशाला सरकारी हमीही आहे, यामुळे ही योजना गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित योजना समजली जाते.

महत्वाची बातमी:Small Business Idea 2022: कमी खर्चात सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला 10 लाख; विश्वास नाही बसत मग एकदा वाचाच

124 महिन्यात पैसे होतात डबल 

मित्रांनो जर तुम्ही या योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर ते काही वर्षांत 4 लाख होतात. या योजनेत मात्र 124 महिन्यांत पैसे दुप्पट होतं असतात. मित्रांनो आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, किसान विकास पत्रामध्ये 6.9 टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जातं आहे.

या योजनेअंतर्गत, तुमचे पैसे केवळ 124 महिन्यांत दुप्पट होतात. मात्र जर कोणत्याही गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षाच्या आत प्रमाणपत्र काढून घेतले तर त्याला व्याजाचा लाभ मिळणार नाही. या योजनेत तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकता.

महत्वाची बातमी:Cheapest Scooter: ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केली की धावते तब्बल 75 किलोमीटर; किंमत आहे मात्र 50 हजार

5 लाख गुंतवणूक केले तर मिळतील 10 लाख

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षे आणि 4 महिने आहे. या काळात तुमची मूळ रक्कम दुप्पट होते. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले असतील तर ते 10 लाखात बदलतील.  लाभार्थी काही अटींनुसार मुदतपूर्तीपूर्वी या खात्यातून पैसे काढू शकतात.

तुम्ही केंद्र सरकारचे किसान विकास पत्र प्रमाणपत्र 1000, 5000,10000 आणि 50000 च्या स्वरूपात खरेदी करू शकता. पैसे मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमचा तपशील द्यावा लागेल, मुदतपूर्तीनंतर तुम्हाला तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमधून मिळू शकतात. हे पैसे तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळू शकतात.

हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा तपशील द्यावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. जर गुंतवणूकदाराला 50000 रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करायची असेल, तर त्याला त्याचे पॅन कार्ड तपशील शेअर करावे लागतील. किसान विकास पत्र योजनेचा वापर हमी म्हणून कर्ज मिळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

महत्वाची बातमी:कामाची बातमी! तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट? आता तुमचा मोबाईलचा कॅमेराच सांगेल; वाचा याविषयी

English Summary: Get Rs 4 lakh by investing Rs 2 lakh in 'Ya' government scheme; Read about it Published on: 10 May 2022, 10:24 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters