मुली या घरातील लक्ष्मी असतात व एवढेच नाही तर कुटुंबामध्ये मुलीमुळे चैतन्य निर्माण होते. अशा या लाडाच्या लेकींसाठी प्रत्येक पालक हे काळजीपूर्वक त्यांच्या भविष्याचे नियोजन करीत असतात. यासाठी केंद्र सरकारने देखील सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या भक्कम राहावे आणि त्यांच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून सुरू केले आहे.
आपल्याला माहित आहेच की, एक ठराविक रक्कम सतत तुम्ही जमा करत गेल्यावर मुलींना वयाच्या एकविसाव्या वर्षी एकरकमी रक्कम मिळते व ती रक्कम मुलींच्या सुखी जीवनाचा एक आधारस्तंभ बनते व त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील स्वावलंबी बनवते.
सुकन्या समृद्धी योजनेतील तरतुदी
सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजना असून यामध्ये गुंतवणूक करून मुलींचे शिक्षणाचाच नाहीतर त्यांच्या लग्नाचा खर्च देखील निघू शकतो. या योजनेच्या माध्यमातून दहा वर्षाखालील मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडले जाते व या योजनेअंतर्गत वर्षाला अडीचशे ते दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
एका कुटुंबातील किती मुली या योजनेसाठी पात्र असतात?
आपल्याला मनात प्रश्न पडत असेल की एका कुटुंबातील किती मुलींना या योजनेत सामावून घेता येईल. या योजनेत पूर्वी दोन मुलींच्या खात्याला कलम 80 सी अंतर्गत करांमध्ये सूट मिळायची पण आता त्यात थोडा बदल करून त्यातील तरतुदी लवचिक करण्यात आले आहेत. समजा जर घरात एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांना देखील हे खाते उघडल्यावर आता करामध्ये सूट मिळणार आहे.
खाते कधी बंद करता येते?
या योजनेअंतर्गत उघडलेले खाते दोन परिस्थितीत बंद करण्याची तरतूद आहे त्यातील पहिली म्हणजे दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला आणि दुसरे म्हणजे मुलीचा पत्ता बदलला तर.
परंतु नव्या बदलानुसार गत जर खातेधारकाला जीवघेणा आजार झाला तरी खाते बंद करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. समजा पालकांचे निधन झाले तरी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुदतीपूर्वी बंद करता येऊ शकते.
सुकन्या समृद्धीत खाते उघडण्याची प्रक्रिया
या योजनेत जर तुमच्या लेकीचे खाते उघडायचे असेल तर पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत मुलगी 21 व्या वर्षी प्रौढ मानली जात असली तरी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील शिक्षणासाठी खात्यातून पैसे काढण्याची तरतूद आहे व 31 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम मिळते.
या योजनेत 7.6 टक्के दराने व्याज मिळते व अल्प रक्कम गुंतवून लाखो रुपये तुम्हाला जोडता येतात. पोस्ट ऑफिस व बँकेच्या सर्व बचत योजनांपैकी सर्वात जास्त व्याज मिळणारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. जर तुम्ही या योजनेमध्ये दरमहा हजार रुपये गुंतवले तर तुमच्या मुलीला वयाच्या एकविसाव्या वर्षी 7.6 टक्के व्याजदराने 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
Share your comments