शेतकऱ्यांसाठी सरकार (government) नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. मात्र आता सरकारने आणखी एक दिलासादायक बातमी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (farmers) मदत निधी (funds) वितरणाचा निर्णय सरकारने सोमवारी 19 सप्टेंबर रोजी घेतला. नाशिक जिल्ह्यासाठी जून, जुलै २०२२ मधील नुकसानीपोटी २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट-सप्टेंबरसाठी २३ लाख असा एकूण ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरित करण्यात आला आहे. नंतर जून ते ऑक्टोबर (octomber) २०२२ या कालावधीत झालेल्या व होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी शासन ११ ऑगस्ट २०२१ नुसार विहित करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत दिली जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये 'या' राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकणार; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
एकूण २७ लाख ८४ हजार रुपये इतका निधी
ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानुसार देण्यात आलेल्या निधीमध्ये वाढीव दराने व ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीतसाठी झालेल्या नुकसानीसाठी मदत निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महत्वाचे म्हणजे यात मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यांसारख्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय असलेला बाबींच्या नुकसानीकरिता बाधितांना वाढीव दराने मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजूरी दिली आहे.
फक्त 50 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीत मिळवा चांगला नफा; ग्रामीण पोस्टल योजना करतेय मालामाल
शासन निर्णयानुसार ७ कोटी २४ लाख ६६ हजार आणि ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या नुकसानीसाठी २० कोटी ६९ लाख १८ हजार असा एकूण २७ लाख ८४ हजार रुपये इतका निधी अतिवृष्टिग्रस्त संबंधित जिल्ह्यांना लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी
दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का? वाचा आयुर्वेदातील महत्वाच्या गोष्टी...
LIC च्या नवीन पेन्शन योजने संबंधित खास 10 महत्वाच्या गोष्टी; जाणून घ्या
Share your comments