सध्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांकडून विविध कृषी योजना राबविल्या जात आहेत. बिहार सरकारही शेतीच्या विविध योजना राबवत आहे. फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी बिहार सरकारने एक योजना आणली आहे.
फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार आता शेतकऱ्यांना मोफत रोपांचा पुरवठा करणार आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठी अनुदान देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे असल्याचे दिसत आहे. यामुळेच बिहार सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना आणली आहे.
कृषी जागरणकडून करिअर सक्षमीकरणासाठी 'विंग्स टू करिअर' उपक्रम सुरू
फळबाग उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो. यामुळे याकडे शेतकरी वळत नाहीत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार याचा पुढाकार
यासाठी बिहार सरकारने ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सुधारित तंत्राचे हळद लागवडीचे नियोजन
राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, राजेंद्र पवार यांचा पुढाकार
Share your comments