इंदापूर तालुक्यातील काझड येथे पोषणयुक्त आहार अंतर्गत परसबागेतील भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. त्यावेळी स्वताच्या कुटुंब निरोगी आरोग्यासाठी परसबाग करावी. असे आवाहन कृषी पर्यवेक्षक घुले साहेब व कृषी सहाय्यक कांबळे एस. जी यांनी केले.
शेतकरी कुटुंबाच्या अन्न सुरक्षेबरोबर पोषण सुरक्षितताही महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने जीवनसत्त्वे खनिजे इ. आवश्यक पोषण मुल्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजच्या परिस्थितीत कुपोषण हे अन्न कमतरतेमुळे नसून पोषण मूल्यांच्या अभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पोषण मूल्यांच्या अभावी लहान मुलांमध्ये तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य भाज्या असणे आवश्यक आहे.
शेतकरी कुटुंबाला विविध भाजीपाला कडधान्य बियाणे पुरवठा करून त्याची लागवड केल्यास त्यातून येणाऱ्या उत्पादना मधून पोषण मूल्यांची गरज भागवणे शक्य होऊ शकते. तसेच आपण स्वतः लागवड केलेल्या शेतात कीड रोगांसाठीच्या विषारी औषध फवारणी यांचे प्रमाण मर्यादित ठेवून किंवा पूर्णतः टाळून विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकते.
गोमूत्र करणार शेतकऱ्यांना करोडपती! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार..
या दृष्टीने 2022- 23 साठी ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. असे घुले साहेबांनी सांगितले, तसेच कृषी सहाय्यक एस. जी. कांबळे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड बांधावर रोपे लागवड या योजनेची पूर्ण माहिती दिली. तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया पी एम एफ एम इ विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..
कृषी यांत्रिकीकरण योजना ठिबक सिंचन योजना विषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी ग्रामसेवक भोंगसाहेब, काझड गावचे सरपंच अजित नरुटे, उपसरपंच राजू मोरे, सोमनाथ नरुटे, बापूराव नरुटे, अर्जुन नरुटे, अशोक नरुटे, सचिन नरुटे, बाबासो नरुटे, प्रशांत नरुटे, सुरेश पाटील, नाथा पाटील, महेंद्र खताळ, महादेव नरुटे, अजित नरुटे, अमर झगडे, शिवाजी नरुटे, संतोष नरुटे, अण्णासाहेब नरुटे, भीमराव नरुटे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, राष्ट्रवादीला मोठा धक्का..
साईबाबांचे दर्शन घेऊन मोठा नेता मुंबईला रवाना, आता लाल दिवा घेऊनच येणार?
आता दुधाच्या रिकाम्या पिशवीवर मिळणार पेट्रोल डिझेलवर सूट, वाचा अनोखी ऑफर
Share your comments