केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेमधीलच पीएम किसान (pm kisan) ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यामध्ये 6 हजार रुपये दिले जातात.
आपण पाहिले तर सरकारकडून निश्चित करण्यात आलेली ई-केवायसीची (E-KYC) अंतिम मुदतही संपली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी 31 ऑगस्टपर्यंत झालेली नाही.
प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता यांनी पीएम किसान योजनेच्या दिलेल्या माहितीनुसार 12 वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडर झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
5 सप्टेंबरपर्यंत (5 september) योजनेशी संबंधित रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर (transfer) होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. अरुण कुमार मेहता यांनी म्हंटले आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, यावेळी सरकारचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांचा लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हा आहे.
पीकविमा योजनेअंतर्गत 'माझी पॉलिसी माझ्या हातात' उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा
विशेष म्हणजे जे शेतकरी पात्र आहेत. त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही. केंद्र सरकारने (central government) जेव्हापासून या योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक केलीआहे, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
पशुपालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यानंतर 'या' जिल्ह्यात 109 जनावरांना लंपी आजाराची लागण
सरकारच्या 'या' योजनेत दररोज जमा करा फक्त 233 रुपये; 17 लाख रुपयांचा मिळणार लाभ
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; शेततळे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान
Share your comments