नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या दरम्यान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 273 कोटीं 10 लाख 3 हजार 109 रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे.
त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात 2 लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांच्या 2 लाख 42 हजार 811 एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 339 कोटी 68 लाख 52 हजारांची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने ही रक्कम जिल्ह्याला दिली आहे. बुधवारी जिल्ह्यातील एकूण 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या खात्यात 271 कोटी 10 लाखरुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून मदत दिली जाणार आहे.
सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर
तालुकानुसार रक्कम
रामटेक - 4012 शेतकरी, 9.40 कोटी रक्कम
मौदा - 1,836 शेतकरी, 21.98 कोटी रक्कम
काटोल - 30,129 शेतकरी, 44.47 कोटी रक्कम
नागपूर(ग्रा) - 7,224 शेतकरी, 10.83 कोटी रक्कम
नरखेड - 32,676 शेतकरी, 3820 कोटी रक्कम
कळमेश्वर - 17,461 शेतकरी, 27.6 कोटी रक्कम
सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणूक होण्याची शक्यता; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य
भिवापूर - 18,450 शेतकरी, 21.48 कोटी रक्कम
पारशिवनी - 11,264 शेतकरी, 16.22 कोटी रक्कम
सावनेर - 19,540 शेतकरी, 30.94 कोटी रक्कम
उमरेड - 17, 456 शेतकरी, 25.85 कोटी रक्कम
हिंगणा - 11,167 शेतकरी, 17.43 कोटी रक्कम
कुही - 19,334 शेतकरी, 20.20 कोटी रक्कम
कामठी -6724 शेतकरी, 8.83 कोटी रक्कम
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; तब्बल 14 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई, शासन निर्णय जारी
सावधान! मुंबईतून तब्बल 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषधी विभागाने दिली माहिती
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; कृषी विभागाकडून सल्ला, तूर आणि भाजीपाला पिकांची घ्या 'अशी' काळजी
Share your comments