गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. यामुळे त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. असे असताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, यामध्ये आता शेतीमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. गेल्या दोन महिन्याच्या काळात शेतीमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांनी 7 कोटी 49 लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
आवक वाढली की (Agricultural Good) शेतीमालाचे दर घसरणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. असाच काहीसा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. यामुळे ही योजना फायदेशीर ठरत आहे. शेतीमाल साठवणूकीतून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीमाल निहाय क्लस्टरमध्ये कर्ज वितरणाची योजना आहे. राज्य सहकारी बॅंकेमार्फत ही योजना राबवली जाते. याचा सध्या अनेक शेतकरी फायदा घेत आहे.
बाजारपेठेत शेतीमलाला दर नाही आणि शेतकऱ्यास पैशाची गरज भासल्यास ही शेतीमाल तारण योजना शेतकऱ्यांच्या मदतीला येत आहे. यामध्ये शेतकरी शेतीमाल ठेऊन त्यावर कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज तर भागते पण शेतीमालही टिकून राहतो. योग्य दर मिळाला की त्याची विक्रीही करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा तिहेरी फायदा होत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटले, शेतकरी समाधानी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा आधार घेतला आहे. 1 हजार 931 टनाच्या शेतीमाल तारणातून शेतकऱ्यांना 7 कोटी 49 लाख रुपये कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये कर्ज हे हळदीपोटी घेतले गेले आहे तर त्यापाठोपाठ सोयाबीनवर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. तसेच सध्या पावसाचे दिवस आहेत. यामुळे आपला माल देखील सुरक्षित राहत आहे. यामुळे जास्त कष्ट आणि चिंता देखील करण्याची गरज शेतकऱ्यांना नाही.
'मला साखरेतील काही कळत नाही, पण प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो'
आता हळद आणि सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यावरच शेतकऱ्यांना ते अधिकच्या दरात विक्री करता येणार आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात शेतीमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांनी 7 कोटी 49 लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. यामध्ये हजारो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांपुढे हा एक चांगला पर्याय उभा आहे.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसाबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, पुण्यात साखर परिषदेचे आयोजन
पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा करणे
'गडकरींचे भाषण ऐकून मला वाटले की साखर कारखाना काढावा, पण मी काढणार नाही कारण...'
Share your comments