केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (new scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीकविमा दिला जातो.
ही बातमी परभणी जिल्ह्यातील (Parbhani) शेतकऱ्यांसाठी आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये अग्रीम विमा मंजूर (Insurance approved) करण्यात आला होता. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
खुशखबर! आता पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूकदारांना मिळणार 'ही' महत्वाची सुविधा
या मंडळात असे मिळत आहेत पैसे
गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी
जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी
मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी
परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी
वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर
परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी
झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी
पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये
सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी
एकूण 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या
‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
या 'पाच' राशीच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Share your comments